तुमचा बाप तुमच्यावर अन्याय करतोय ?
मी लहान होतो तेव्हा माझा बाप माझ्यावर अन्याय करतोय असं मला वाटायचं. त्याचं वागणं चुकीचं नसेल. किंवा मी आज ज्या रीतीनं माझ्या पायावर उभा आहे ते पाहिलं कि वाटतं त्याचं वागणं चुकीचं नव्हताच. पण तरीही मी माझ्या मुलांशी फार कठोरपणे वागू शकत नाही. तरीही माझ्या मुलांना माझं वागणं कठोर वाटत असेल. पण मित्रांनो नाही. प्रत्येक बाप त्याच्या मुलांशी जे काही वागतो ते त्या मुलांच्या उज्ज्वल भावितव्यासाठीच. पण हे आज पटतंय. त्यातूनच ‘ बाबा ‘ ह्या कवितेचा जन्म झाला.
खरंतर तर हि कविता मी माझ्या ब्लॉगवर मागेच पोस्ट केली होती. पुन्हा तीच कविता पोस्ट करतोय म्हणून माझी ‘ नवं लिहिण्याची कुवत संपली कि काय ?’ असा समाज करून घेण्याचं काही कारण नाही. केवळ तेव्हा माझा ब्लॉग मराठी विश्वला जोडलेला नव्हता. म्हणून आज पुन्हा एकदा तीच कविता पोस्ट करतोय.
पुन्हा असं होणार नाही हे निश्चित.
About this entry
You’re currently reading “तुमचा बाप तुमच्यावर अन्याय करतोय ?,” an entry on रे घना
- Published:
- August 19, 2010 / 10:09 pm
- Category:
- सामाजिक , राजकीय



13 Comments
Jump to comment form | comment rss [?] | trackback uri [?]