समोरासमोर………… दोन परमेश्वर

मंगेश तेंडुलकरांचा आणि माझा परिचय पाच सहा वर्षापूर्वीचा. ध्यानीमनी नसताना झालेला. झाला काय होतं….माझ्या दुसऱ्या काव्य संग्रहाचं ‘ वाजंतं पैंजण……वाजंतं काकंण ‘ चं प्रकाशन होतं. तेव्हाचे दैनिक सकाळचे संपादक श्री. अनंत दिक्षित प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते.

पण ऐनवेळी त्यांना काही कार्यालयीन कामासाठी नागपूरला जावा लागलं. मी सतत त्यांच्या संपर्कात. पण तीन वाजले तरी ते पुण्यात पोहचण्याची चिन्ह दिसेनात. प्रकाशन सोहळा सहा वाजता. आता काय करावं ???? मी पूरम चिंताग्रस्त. ऐनवेळी कुणाला सांगाव ???? मला जेष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकरांचं नवा आठवलं.

त्यांचा माझा परिचय मुळीच नव्हता. इतकाच काय त्यांचा कुठलाही संपर्क नंबरही माझ्याजवळ नव्हता. एका मित्रान नंबर दिला. त्यांना सारी परिस्थिती सांगितली. झालं……..!!!!!!!!  कुठलंही निमंत्रण नाही………मानपान नाही……….आणायला गाडी घोडा नाही……….मानधनाचही काही ठरला नाही आणि तासाभरात हे गृहस्थ प्रकाशन सोहळ्यासाठी हजर. तेव्हा त्यांना पाहिलं……..पुढच्या वर्ष दोन वर्षात अनुभवलं. जेव्हा जेव्हा त्यांच्या श्वासात वावरलो तेव्हा परमेश्वर यापेक्षा वेगळा असावं असं कधीही वाटलं नाही. मी स्वतः कधीच कुणाची स्तुती करीत नाही.मंगेश तेंडुलकरांनाही कुणी त्यांची स्तुती केलेली आवडत नाही. तयंची स्तुती करून मला त्यांच्याकडून काही मिळवायचंही नाही. त्यामुळे विश्वास ठेवा मित्रहो…….केवळ त्यांच्याविषयीच्या प्रचंड आदरापोटीच ही कविता माझ्याकडून लिहिली गेली. ती ही कविता -

back  ground  चा हा फोटो मी स्वतःच त्यांच्या चित्राच्या पन्नासाव्या प्रदर्शनादिवशी काढलेला. प्रत्यक्ष नाना पाटेकर उदघाटक. मी पाहिलेले दोन कलावंत…………दोन परमेश्वर…….समोरासमोर.


About this entry