प्रेम असं करावं
प्रेम हि माणसाची मुलभूत गरज आहे हे पटल्यावर त्याविषयी सतत लिहिणा हे ओघानं आलाच.
म्हणूनच ‘ प्रेम कसं करावं ? ‘ या लिखाणाला रसिकांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून मला त्याचं उत्तरही द्यावंसं वाटलं.
वसंत ऋतूला फुलता यावं म्हणून शिशिरात गळून पडणाऱ्या पानांसारख प्रेम आपल्याला का नाही करता येत ? कुठल्याही अनिष्टापासून दुधाचं रक्षण करणाऱ्या दुधावरच्या सायीसारख प्रेम का नाही करू शकत आपण ?
बाला कुशीत घेवून जोजवणारी आई कधी कधी स्वतःच बाळाच्या कुशीत शिरते आणि म्हणते, ” चला !!! आता मला गाई गाई करा. ” आणि मग ते मुठी एवढ बाळ पहाडाएवढ्या आईला कुशीत घेऊन गाई गाई करू लागतं.
का नाही तरुणाई एवढ निरपेक्ष प्रेम करू शकत ? आपलं स्वार्थानं काठोकाठ भरलेला प्रेमाचा हिणकस रूप पाहिलं कि मला डहाळीवरच्या रघु मैनेचं प्रेमही आपल्यातल्या प्रेमापेक्षा खूप खूप श्रेष्ठ वाटायला लाग
तं.
माणसाचं अनुकरण म्हणून पशु – पक्षी एकमेकांवर प्रेम करू लागले नाहीत, तर माणूसच पशुपक्षांच अनुकरण करून परस्परांवर प्रेम करू लागलाय.
पण………….
नैसर्गिक प्रेमातल निरापेक्षतेच तत्व हरवून बसलाय. हे थांबायला हवं म्हणून हवं. म्हणूनच ही कविता -
About this entry
You’re currently reading “प्रेम असं करावं,” an entry on रे घना
- Published:
- December 4, 2010 / 11:57 pm
- Category:
- प्रेम कविता
- Tags:
- प्रेम, प्रेम कविता, मराठी कविता, love, love poem, marathi poem


8 Comments
Jump to comment form | comment rss [?] | trackback uri [?]