सुखाचं मूळ
आधी माझ्या सर्व रसिकांना आणि ब्लॉगर मित्र मैत्रिणींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
जगात सुखी कोण आहे ? मुळात सुख म्हणजे काय ? सुख असतं कशात ? चांगलं खाण्यात ? इकडं तिकडं फिरण्यात ? आपल्या हव्या असणाऱ्या माणसाच्या सहवासात ?
तुम्ही म्हणाल, ” च्यायला यानं नव्या वर्षाच्या भोनिलाच हि काय भंकसगिरी लावलीय ?
परवा वर्ल्डकप कोणी जिंकला माहिती आहे ?
आता मात्र तुम्ही सटकलेले असाल.म्हणत असाल, ” च्यायला, काय लावलाय काय यानं आज ? अरे, आम्हालाच काय, साऱ्या जगाला माहिती आहे वर्ल्डकप भारतानं जिंकलाय ते. “
होय ! वर्ल्डकप भारतानं जिंकलाय हे खरय. पण तो खऱ्या अर्थानं जिंकलाय तुमच्या माझ्या सारख्यांच्या आशावादानं. आपण १२१ कोटी भारतीयांनी भारताच्या विजयाची आशा बाळगली. म्हणून भारतीय संघ जिंकला. भारतीय संघानं वर्ल्डकप जिंकला पण सुख कोणाला मिळाला हो ? आपल्या सगळ्यांनाच ना !!! म्हणून म्हणतो, ” खरं सुख आहे इतरांच्या सुखाची कामना करण्यात.”
मानलं तर सुख कशातच नाही. आणि मानलं तर कडूलिंबाचा पाला खाण्यातही सुख आहे.
हे आम्हाला शिकवलंय आम्हाला आमच्या गुढीनं. फक्त त्या सुखप्राप्तीसाठी लिंबाच्या पाल्यात घालायला हवा तोळाभर गूळ. हा तोळाभर गुळाचा खडाच मग प्रत्येक पावलाला सुखाची पेरणी करत जातो.
About this entry
You’re currently reading “सुखाचं मूळ,” an entry on रे घना
- Published:
- April 4, 2011 / 12:36 am
- Category:
- Uncategorized
- Tags:



6 Comments
Jump to comment form | comment rss [?] | trackback uri [?]