इंडियंस आर ग्रेट
हिदुस्तानात सम्राट अशोका पासून गौतम बुद्धांपर्यंत अनेक महात्मे होऊन गेले.
याच मातीत स्वात्यंत्र वीर सावरकर, आगरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, यासारखे हुतात्मे जन्मले.
याच मातीत रंगली बाजीराव – मस्तानीची प्रेम कहाणी.
ताजमहालच्या रुपात याच मातीवर उभी राहिली प्रेमाची निशाणी.
सत्तेसाठी हपापलेल्या सत्ताधुंद राजकारण्यांनी या मातीची हि ओळख पुसून टाकायचा अगदी चंगच बांधलाय.
पण तरीही या मातीची ओळख सांगणारे या मातीत निपजतातच. खेळाच्या मैदानावर तर हे प्रकर्षानं जाणवत.
मला आठवणारं सुनील गावस्कर हे त्यातलं पाहिलं नाव. अंपायरनं बोटवर करायच्या आधी मैदानातून परत फिरणारं.
सचिन तेंडुलकर हे आणखी एक नाव कुणाच्याही स्लेजिंगला उत्तर न देणारं. शतकांमागून शतकं करणारं. शतकांच शतक करू पाहणार.
खरंतर या विश्वकपमध्ये सचिनच्या शतकांच शतक व्हायला हवं होतं.
पण आफ्रिदी शिंकला. म्हणाला,” आम्ही सचिनचं शंभरावं शतक होऊ देणार नाही.” आणि खरंच त्यानं सचिनचं शंभरावं शतक होऊ दिलं नाही आणि खाली मान घालून निघून गेला.
हे सारं लिहिण्याला एक कारण झालं.
आजची आय. पी. एल. ची. म्याच.
रॉयल चायलेंज बंगलोर विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्सची.
जिंकायला धावा उरलेल्या २.
मैदानात खेळताहेत ख्रिस गेल आणि विराट कोहली. गेल ९८ धावांवर. फलंदाजी करत होता विराट मनाचा कोहली. एक दोन वेळा १ धाव काढायची संधी होती. पण विराटनं ते टाळलं. आख्खं षटक निर्धाव खेळून काढलं. त्यात एक दोनदा बाद होता होतही वाचला. मध्येच एक चेंडू वाईड पडला. गेलची शतकाची संधी हुकते कि काय म्हणून विराटला वाईटही वाटलं. समोरच्या गोलंदाजाला त्यानं नाक मुरडलं.
षटक संपलं. गेलला स्ट्राईक मिळाली. त्यांना चौकार मारला. शतक केलं. विराट खूष.
तेव्हा आठवलं ‘ कुठं सचिनचं शंभरावं शतक होऊ नये म्हणून बिब्बा घालणारा आफ्रिदी आणि कुठं गेलचं शतक व्हावं म्हणून विजयी फटक्याचा मोह आवरून एक आख्खं षटक निर्धाव खेळून काढणारा कोहली.’
म्हणूनच म्हणतोय. ‘ इंडियंस आर ग्रेट ‘
About this entry
You’re currently reading “इंडियंस आर ग्रेट,” an entry on रे घना
- Published:
- April 22, 2011 / 10:50 pm
- Category:
- लेख
- Tags:
- क्रिकेट, सचिन, cricket, ipl cricket, sachin tendulkar, world cup 2011


2 Comments
Jump to comment form | comment rss [?] | trackback uri [?]