खरं नातं
( यातील छायाचित्रे मला आलेल्या एका मेल मधून घेतली आहेत. पाहायला विसरू नका. )
एक आई !!!!!!!!!!
१ ) आपल्या पिलाच्या जीवाशी खेळणाऱ्या कुत्र्यावर धावून जाणारी मुठी एवढी खारुताई
२) आपल्या पिलाला डोंगराएवढ्या कुत्र्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी त्याच्या कानाचा कडकडून चावा घेणारी खारुताई
३ ) आपल्या पिलाला कुत्र्याच्या तावडीतून सोडविणारी खारुताई
४ ) आशाळभूतपणे पहात राहिलेला कुत्रा
आणखी एक आई !!!!!!!!!!!!!!!
१ ) हतबल अशा आपल्या पिलाला छळणारया कुत्र्यावर धावून जाणारी माकडीण ( आई )
२ ) त्या कुत्र्यावर चढाई करणारी माकडीण ( आई )
३ ) मान खाली घालून निघालेला पराभूत कुत्रा हतबल
स्त्रीच्या नात्याला पदर अनेक. मुलगी म्हणून ती जन्माला येते. लहानाची मोठी होते. तिच्या पाठी आणखी कोणी आला तर तिला बहिण नावाचं आणखी एक नातं लाभत. ती तारुण्यात पाऊल ठेवते आणि प्रेयसी होते. लग्नंतर पत्नी मग आई…………मावशी………… काकी……………मामी……….जाव………….नणंद………वाहिनी………..आजी……….अशा कितीतरी नात्यांची वीण तिच्याभोवती असते.
पुरुष भोवतीही नात्याचे एवढेच पदर असतात. पण स्त्रीला प्रत्येक नात्यातून जाताना जी अग्नी परीक्षा द्यावी लागते त्यामुळे स्त्रीच्या नात्याला असणाऱ्या पदराविषयीच नेहमी बोललं जातं. पण मला आलेली हि मेल मी जेव्हा मी पहिली तेव्हा वाटलं स्त्रीच्या नात्याला असणाऱ्या या अनेक पदारांपैकी ‘ आई ‘ हाच पदर अधिक खरा.
उरलेल्या प्रत्येक नात्याला कुठ न कुठ स्वार्थाची ………लोभाची…….मोहाची……….किनार असते. त्यामुळेच स्त्रीच्या नात्याला असणाऱ्या या अनेक पदारांपैकी ‘ आई ‘ हेच नातं अधिक खरं असं मला वाटत. म्हणूनच मी माझ्या -
आई !!!!!!
या पोस्ट मध्ये म्हणालंय -
‘ आई डोक्यावरचं आभाळ , आई पायाखालची माती
आई सशाचं काळीज , आई सिंहाची छाती ‘
पण मला आलेल्या या मेल मध्ये आणखी एक फोटो होता. त्यामुळं मला ‘ प्राण्यान मधली आई ‘ आणि ‘ पशु – पक्षान मधली आई ‘ अशी तुलना करावीशी वाटली. त्याविषयी नंतर लिहीन.
पण आज आई मधल्या ईश्वराला मनापासून दंडवत !!!!!!!!!!
About this entry
You’re currently reading “खरं नातं,” an entry on रे घना
- Published:
- May 11, 2011 / 7:35 am
- Category:
- ललित, लेख, सामाजिक , राजकीय
- Tags:
- प्रेम, सामाजिक , राजकीय, love









4 Comments
Jump to comment form | comment rss [?] | trackback uri [?]