माझा निर्णय झालाय पण ….
( कृपा करून तुमचं मत नोंदवायला विसरू नका. )
मित्रहो मी पुण्यात एका बहूदेशीय कंपनीत प्रोडक्शन म्यानेजर या पदावर कार्यरत आहे. अजून १५ – १६ वर्ष सर्व्हिस बाकी आहे पण. तरीही मी नौकरी सोडून गावी जाऊन शेती करायचा निर्णय घेतलाय. शेतीत स्वतः काम करायची तयारी आहे. पण हाताखाली एखादं चांगलं, गरीब, प्रामाणिक, कष्टकरी जोडपं असावं असं असं वाटतंय. खूप काही नवं करतानाच त्यांनाही नक्कीच चांगल्या मार्गान घेऊन जाईन असा विश्वास आहे. पण अशा गरीब, प्रामाणिक, कष्टकरी जोडप्याच्या शोधात आहे.
खरंतर माझा गेली पंचवीस एक वर्ष शेतीशी संबंध आला नाही. पण त्याआधी मी बऱ्यापैकी शेतीत राबलोय. शेतीची थोडी बहुत ओळख तेव्हापासून झालीय.
हा माझा लेख तेव्हाच्याच आठवणींवर आधारित.
हि कविताही त्या जाणिवेतूनच लिहिलेली.
हा लेख तर अलीकडच्या माझ्या पाच श महिन्यातल्या वास्तव अनुभवातून आलेला.
आज मी माझ्या नौकरीत दिवसाचे बारा तास राबतोय. प्रचंड टेन्शन, मिटिंग, डिलिव्हरी प्रेशर, कामगारांच्या समस्या, वरीष्टांची आरेरावी, मनमानी, आणि या सगळ्याच्या बदल्यात हाती पडणारा मोजका पगार. आपण खूप काही करतो आहोत आपल्या कंपनीसाठी याचा सुख मिळत पण त्याचा मोबदला मिळत नाही यातली निराशा. वरिष्ठांच्या पुढे पुढे करून स्वतःच हित.साधणारी मंडळी…….साहेबांचं चांगभलं करणाऱ्यांचा होणारा उत्कर्ष……..हे खूप वर्ष पहात आलोय. आपल्या भारतात सगळीकडेच हि परिस्थिती. गुणवत्तेपेक्षा हुजरेगिरी महत्वाची. आणि म्हणूनच वाटतं आपण आपली वाट चालावी. आपल्याला हवं तसं काही निर्माण करावं. माणसांना एक नवा संस्कार द्यावा. खूप काही वेगळं करायची इच्छा आहे.
आणि मला खरं सुख वाटतंय ते नव्या निर्मितीत. शेती करताना मला रोज त्या अनुभवातून जायला मिळणार आहे.
माझा निर्णय झालाय पण ……….तरीही तुमचा मत हवाय.
रेटिंग मध्ये तुमचं मत नोंदवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय हेच माझं पाठबळ.



8 Comments
Jump to comment form | comment rss [?] | trackback uri [?]