ती आणि पाऊस

पावसाळ्याचे दिवस. काळे ढग….. गार वारा आणि तिची वाट पाहत थांबलेला तो. कित्ती वेळाची वाट पाहतोय तो. पण ती येत नाही. पाऊस मात्र बरसतोच आहे रिम झिम. आभाळातून आणि त्याच्या डोळ्यातूनही. फार फार राग येतो त्याला तिचा. नेहेमीच उशीर. उशीर करायचा आणि ओठावर एक गुलजार, खट्याळ हसू घेऊन यायचं. तिचं ते खट्याळ हसू पाहिलं कि तोही तिला झालेला उशीर……त्याच्या जीवाची झालेली तगमग सारं सारं विसरून जायचा. फक्त तिचा तिचा व्हायचा. स्वतःचं अस्तित्व विसरून तिच्या डोळ्यात बुडून जायचा.

पण आज मात्र वाट पहाण्याची परिसीमा होते. पण तिची चाहूलही लागत नाही कुठे वाटेवर. पाऊस मात्र बरसात असतो त्याच्या डोळ्यातून अन आभाळातून. तेव्हा त्याला वाटतं तिच्या पेक्षा पाऊसच बरा. तो नेहमीच आपली सोबत करतो. ती सोबत असते तेव्हाही आणि ती सोबत नसते तेव्हाही. म्हणून तो म्हणतो -

 पाऊस, प्रेम कविता, love poem, पावसाच्या कविता
पाऊस, प्रेम कविता, love poem

About this entry