बायको आणि बोका

मांजर, बोका, बायको. नवरा
मांजर, बोका, बायको. नवरा

या लेखाचं शीर्षक वाचल्या नंतर अनेक जण कुतूहलापोटी हा लेख वाचतील. पण हा लेख ( किंवा लेख तरी का म्हणायचं याला स्फुट लेखन हि म्हणू या.) लिहिताना कुणावर टीका करावी असा हेतू मुळीच नाही.
सहज गंमत म्हणून लिहितोय. त्यामुळेच हे लिखाण वाचल्यानंतर स्त्रियांनी माझ्या नावाने बोटं मोडून मला शिव्याशाप देऊ नयेत आणि पुरुषांनी सातमजली हास्य ताणून एकमेकांना टाळ्या देऊ नयेत. पण समाजात अशा रीतीची विधानं जन्माला येतात तेव्हा कुठंतरी काहीतरी चुकतंय आणि ते आपण दुरुस्त करावं हे नक्कीच.

कवि आणि कविता, पगडी आणि सरदारजी, दारू आणि दारूबहाद्दर, नवरा आणि बायको हे नेहमीच अनेक विनोदांच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. अशा अनेक विनोदांनी समाजाचं मनोरंजन केलं आहे. पण तरीही कवि आणि कवितेवरचे विनोद ऐकून मला नेहमीच वाईट वाटत. पण त्याला कारणीभूत नव्या दमाचे अनेक कवीच आहेत हे हि तेवढंच खरं.

आता पुन्हा मूळ विषयाकडे वळू या.

परवा मला एक मेल आलेली. ती अशी –

मांजर आणि नवरा यांना कुठंही नेऊन सोडलं तरी ते परत घरी येणारच
आणि बायको आणि बोका यांचे कितीही लाड केले तरी ते गुर्रगुर्रणारच.

आणखी एके ठिकाणी बायको म्हणजे टिव्ही आणि ती ( खास सुरात लिहिता येत नाही पण समजून घ्यावं ) म्हणजे मोबाईल या दोन गोष्टींची तुलना केली होती. ती अशी –

जसं टिव्हीचं आपल्याला फक्त ऐकूनच घ्यावं लागतं तसंच बायकोचंही. याला श्रवण म्हणतात. तर ती मात्र जसं आपल्याला सुनावते तसंच आपलं ऐकूनही घेते अगदी मोबाईलप्रमाणे. याला हितगुज म्हणतात. 


About this entry