गणपती आणि बुजगावणं
सोसायटीत चित्रकलेची स्पर्धा होती. तीन गटात. परीक्षकाच काम माझ्या पत्नीकडे होतं.
राजकारणात स्त्रियांना एक तृतिआंश आरक्षण लाभल्यानंतर गावागावात महिला सरपंच होण्याचं पेव फुटलं. पण बाई सरपंच नावालाच. सगळा कारभार धन्याच्याच हातात.
आमच्याकडेही तसंच झालं. परीक्षकाच काम पत्नीकडे पण तिनं सगळी चित्रं माझ्यासमोर टाकली. झकासच होती चित्रं. मी पटापटा दोन्ही गटातली पहिल्या तीन क्रमांकाची चित्र वेगळी केली. तिच्याकडे दिली आणि म्हणालो, ” मला हि चित्र ठीक वाटताहेत. पण परीक्षक तू आहेस. तुला योग्य वाटेल ते कर.”
तिनंही सगळी चित्रं नजरेखालून घातली. आणि मला म्हणाली, ” हे श्रीहरीच चित्रही छान आहे ना ?”
ते चित्रं मलाही आवडलं होतं. पण इतर चित्रांमध्ये रेखीवपणा जास्त होता. आणि या चित्रात कल्पनेचा वेगळेपणा. हा बुजगावण्याच्या रूपातला गणपती आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडला. आणि आम्ही बहुमतानं त्याला उत्तेजनार्थ पारितोषिक द्याचं ठरवलं. ते हे चित्रं -
About this entry
You’re currently reading “गणपती आणि बुजगावणं,” an entry on रे घना
- Published:
- September 17, 2011 / 7:21 pm
- Category:
- बाल कविता, बडबड गाणी, लेख, हसून पहा
- Tags:
- गणपती, चित्रं, छोट्यांसाठी, देव, for kids



No comments yet
Jump to comment form | comment rss [?] | trackback uri [?]