खुश्शाल पडतो प्रेमात

खूप दिवस झालं मी प्रेम कविता लिहिलीच नाही. त्याला कारणं अनेक होती. देशातला भ्रष्टाचार……..आण्णांचं उपोषण…………त्यानंतरचा बॉम्बस्फोट.

प्रेमविषयक लिहिलं कि रसिक मोठ्या संख्येनं ब्लॉग पहातात हे माहित असूनही मी गेल्या जवळ जवळ महिन्याभरात एकही प्रेम कविता लिहिली नाही.  नाही म्हणायला – ” अजूनही त्याच्या आठवणी “ हि एक प्रेम कविता मी साधारणतः दोन ऑगस्टला पोस्ट केली होती. एका इंग्रजी ब्लॉगवर वाचलेल्या इंग्रजी कवितेचं ते स्वैर मराठी भाषांतर होतं.

ती इंग्रजीतली कविता मला खूप आवडली होती. मी माझी प्रतिक्रिया देवून मोकळा झालो होतो. त्या लेखिकेच्या कवितेचं स्वैर मराठी भाषांतर मी माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे हेही त्या प्रतिक्रियेत सांगून टाकलं होतं. त्या कवितेवर मी लिहिलेली प्रतिक्रया होती सेहचाळीसावी. आणि त्या लेखिकेन ती कविता पोस्ट करून झाले होते अवघे तीन तास.

मी माझ्या परीनं त्या कवितेचं अधिकाधिक चांगलं भाषांतर करण्याचा प्रयत्न केला होता. वाटला होतं खूप प्रतिक्रिया येतील. पण कसलं काय. अवघी एक प्रतिक्रया. मराठी रसिकांच्या अभिरुचीविषयी शंका वाटावी अशी हि परिस्थिती.

मी कुणाला दोष देत नाही. कुणी मला असंही विचारेल, ” तुम्ही किती जणांना प्रतिक्रिया लिहिता ? ” जेव्हा एखादा लेखन मला खूप आवडता तेव्हा मी खरच अगदी मनापासून प्रतिक्रिया लिहितो. एखादा लिखाण खूपच हीन असेल तर त्या लेखकाची कानउघडणीही करतो.

मित्रहो रागवू नका. स्पष्ट बोलणं जगात कुणालाच आवडत नाही. या प्रेम्कावितेच्या प्रेमात पडलं आणि सारा राग विसराल अशी अपेक्षा.

खेळण्यांशी खेळायचे दिवस संपतात. तारुण्याची मोरपिसी झुळूक अंगभर फिरत असते. कुठल्या नकळत क्षणी आपण त्याच्या प्रेमात पडतो हे आपल्यालाही कळत. पण असं प्रेमात पडल्यानंतरचा प्रत्येक क्षण कसा हवा हवासा वाटू लागतो. त्या क्षणांचीच हि कविता -

खुश्शाल पडतो प्रेमात

प्रेम कविता

 

Advertisement

About this entry