आई !!!!!!

 

आई !!!!!!

आणि आज ९ मे मातृदिन.

निसर्गानं सजीवांच्या ओंजळीत दिलेलं हे एकमेव खरखुरं नातं. बाकीची सारी नाती आपण आपल्याला चिटकवून घेतलेली.

आईच्या वेदना, तिचे कष्ट, तिचं सोसणं, तिनं आपल्यासाठी केलेली धडपड यापैकी कश्शा कश्शाची जाणीव नसते आपल्याला. या साऱ्याची जाणीव ठेवण्याचा हा दिवस.

आई जशी आपल्याला असते तशीच पाखरांना असते……..वासरांना असते. वाघाच्या बछडयाला असते आणि गाढवाच्या गधडयालाही असते. आकाशातून आपल्या पिलांवर झडप घालणाऱ्या बलाढ्य घारीवर कोंबडीसारखा सामान्य जीव धावून जातो. कारण ती आई असते.

मला नेहमीच वाटत आलं आहे माझ्यातला गाणं, माझ्यातली कविता हे सारं मला माझ्या आईकडून मिळालेलं दान आहे. नाही ती कवयत्री नाही. पण कविता तिच्या रोमारोमात असावी. कारण मला अजूनही आठवताहेत तिनं गोड गळ्यानं मला गाऊन दाखवलेली गाणी, माझ्याकडून तोंडपाठ म्हणून घेतलेल्या कविता.

माझी आई जेमतेम पाचवी सहावी शिकलेली. पण आज वयाच्या सत्तरीतही तिला तिच्या पाठ्यपुस्तकातल्या कित्येक कविता, जात्यावरच्या ओव्या तोंडपाठ आहेत.

मला अजूनही आठवतेय मी घाणेरड्या शिव्या दिल्या म्हणून पायतान घेवून माझ्या मागे धावणारी माझी आई, मला अजूनही आठवतेय मी खोटं बोललो म्हणून मला लाथ मारणारी आणि लाथ  मारल्यानंतर माझ्या डोक्याला खोच पडून त्यातून रक्त वहात असतानाही माझ्याकडे दुर्लक्ष करणारी माझी आई. त्याक्षणी मला ती लाथ प्रत्यक्ष वामनाचीच वाटली होती. पण मी बळी राजा नव्हतो. मी बळीराजाच्या पासंगापुरताका होईना पण थोर व्हावं म्हणून तिनं वेळीच उचललेली ती लाथ होती. हि अशी आई जशी मला आठवतेय तशीच बाबांनी माझं अन्न पाणी बंद केलेलं  असताना चोरून मला भरवणारी आईही आठवतेय.
*************
अशीच या कवितेतल्या मुलीची हि आई. दिवसभराचे सारे कष्ट उपसून रात्री अंथरुणावर पडते. शेजारी तिची छोटी मुलगी असते. आईचा डोळा लागला असावा असं वाटून ती मुलगी नेहमीच आपले पाय दाबणाऱ्या आईचे पाय दाबू लागते. पण आपला काळजाचा तुकडा आपले पाय दाबतो आहे या जाणीवेने आई एकदम दचकून उठते. त्याक्षणी आई आणि मुलीत झालेला हा संवाद. आईची थोरवी गाताना ती मुलगी म्हणते,” आई मी काही तुझ्या वंशाचा दिवा नाही. तरी तू माझे असे पाय का चेपतेस ?”

 

 

Advertisements

3 Comments

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s