मातृदिन. ९ मे

“चला चला चला. खेळत काय बसलात ? इकडे या सगळे.”
“काय म्हणालात. आम्हाला आमचा खेळ सोडून एवढ्या तातडीने का बोलावलत ?”
“सांगतो. सांगतो. आज काय आहे माहिती आहे का तुम्हाला ?”
” नाही ना ? सहाजिकच आहे. लहान आहात तुम्ही अजून. पण तरही हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. कारण तो एक आपल्या संस्काराचा भाग आहे. म्हणून तर तुम्हाला एवढ्या तातडीने बोलावलंय.”
“हं ! तर मुलानो आज आहे मातृदिन. ९ मे . लक्षात ठेवाल ना यापुढे ! “
काय म्हणालात ? मातृदिन म्हणजे काय असतं ?”
मुलांनो. मातृदिन म्हणजे आईची थोरवी गाण्याचा दिवस. आईच्या मोठेपणाच स्मरण करण्याचा दिवस. आई आपल्यासाठी राबते. झिजते. हाडाची काड करते. पण आपण कधी तिचे आभार सुद्धा मानत नाही. तिच्यावर कधी सुखाचे चार शब्द उधळत नाही. जगभरातल्या प्रत्येक मुलांना आपल्या आईविषयी कृतन्यता व्यक्त करावी म्हणून जगभरात आज हा दिवस साजरा केला
जातो. “
“म्हणजे काय करायच अक्कलराव ? असं अजिबात विचारू नका. “
“करायचं म्हणलं तर खूप काही करता
येण्यासारखं आहे. खूप काही करू नका. फक्त आज आईला त्रास द्यायचा नाही. म्हणजे इतर दिवशी द्यायचा असं नव्हे. पण आज मात्र तिला थोडाही त्रास द्यायचा नाही. तिच्याजवळ कुठलाही हट्ट करायचा नाही. तिनं सांगितलेलं प्रत्येक काम ऐकायचं आणि तिची गोड पापी घेवून तिचं असंच अखंड प्रेम लाभावं म्हणून देवाजवळ प्रार्थना करायची.”
“मुलांनो आईच्या वेदना, तिचे कष्ट, तिचं सोसणं, तिनं आपल्यासाठी केलेली धडपड यापैकी
कश्शा कश्शाची जाणीव नसते आपल्याला. या साऱ्याची जाणीव ठेवण्याचा हा दिवस.”
“आई जशी आपल्याला असते तशीच
पाखरांना असते……..वासरांना असते. वाघाच्या बछडयाला असते आणि गाढवाच्या गाधडयालाही असते.”
“आकाशातून आपल्या पिलांवर झडप घालणाऱ्या बलाढ्य घारीवर कोंबडीसारखा सामान्य जीव धावून जातो. कारण ती आई असते. बस्स ! एवढंच लक्षात ठेवा आणि यापुढे आईला त्रास देणं बंद करा .”
“कराल ना
एवढ ?”
“सगळेच हो म्हणाले. चला ! मला आजचा दिवस सार्थकी लागल्यासारखा वाटतो आहे. अरे पण असे पळताय कुठे सगळे ?”

“आईच्या कुशीत शिरायला ? ठीक आहे. ठीक आहे. चला मी हि निघालो माझ्या आईच्या कुशीत शिरायला.”


Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s