बैलगाडा शर्यत

महिन्याभरापूर्वी ‘ ई सकाळला ‘ बैलगाडा शर्यतीनवरील बंदीची बातमी वाचली. न्यायालयाच्या निर्णयानंतर बैलगाडा शर्यती बंद पाडायला बाह्या सरसावून निघालेल्या जिल्हा अधिकाऱ्यांच मनोगतहि वाचलं. आणि डोकं भणभनल.

प्राण्यांविषयी सहानभूती दाखविणाऱ्या विविध भूतदयावादी संस्थांचही आश्चर्य वाटलं. हिंदूंच्या कोणत्याही चालीरितीन मध्ये कुणीही किती सहजपणे नाक खुपसत ते हि कळून चुकलं. विशेष म्हणजे हि नाक खुपसणारी मंडळी हिंदूच असतात.

प्राण्यांविषयी सहानभूती दाखविणाऱ्या या मंडळीना पहाटे पाच पासून वाजणारे मशीदिंवरचे कर्णे दिसत नाहीत. त्यामुळे आख्ख्या गावाची होणारी झोपमोड दिसत नाही.

नाही ! मला इथं जातियवाद आणयचा नाही. मुळातच मी जातीयवादी नाही. पण गणपतीच्या दिवसात रात्री दहा नंतर गाणी लावायची नाहीत. दिवाळीत रात्री दहा नंतर फटके वाजवायचे नाहीत. म्हणजे तुमचे सन, तुमचा आनंद तुम्ही रात्री दहा नंतर दाराआड बंद करून टाकायचा. का ? हे निधर्मी राष्ट्र आहे म्हणून !

असो. मला इथं याविषयी लिहायच नाही. माझा मुद्दा एवढाच आहे बैलगाडा शर्यतींवर बंदी का ?

आपण व्यायाम करतो, आपण सकाळी फिरायला जातो. पण आमच्या शेतकऱ्याला अशा वेगळ्या व्यायामाची गरज पडत नाही. कारण तो अखंड कष्ट करीत असतो. बैल पोळा, बैल गाडा शर्यत, जत्रा – यात्रा, कुस्त्या, तमाशा हि त्याची करमणुकीची साधनं आहेत. त्याच्यासाठी कुठेहि सिनेमा नसतो, टि व्ही नसतो, चेंडू फळीचा खेळ नसतो. मग का कुणी असं त्याच्या आयुष्यात नाक खुपसाव ? जशा आपण धावण्याच्या शर्यती खेळवतो तश्याच या शर्यती. त्यावर कुणी अक्षेप घ्यावं असं त्यात काय आहे ?

शिवाय अशा स्पर्धा बैलांमधली कामाची रग टिकवून ठेवायला मदतच करतात. ” माणसानं त्याच्या शेपटीचा वापर करायच सोडून दिलं म्हणून त्याची शेपटी नाहीशी झाली ” असं म्हणतात. बैलांला त्रास होऊ नये म्हणून त्यांच्यावर कमी ओझं लादायला सुरवात केली आणि उद्या त्यांची ओझं वहाण्याची ताकद कमी झाली तर बैलगाडी कोण ओढणार ? नांगराला  कुणाला जुंपायच ?

आमची शहरी मंडळी म्हणतील ट्रेकतार वापरावा. पण पोटापुरती चार दोन एकर शेती असणाऱ्या आमच्या शेतकरी बांधवाना ते धूड सांभाळण परवडणार आहे का ? शिवाय अशा जनावरांपासून मिळणाऱ्या आणि शेतीसाठी सर्वत्कृष्ठ ठरणाऱ्या खताच काय ? तेव्हा माझी तमाम पुस्तकी विद्वानांना हात जोडून विनंती आहे कि त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवावर बेतेल अशा रितीनं त्याच्या जिवनात नाक खुपसू नये.

शेतकऱ्यांविषयी, त्याच्या जनावरांविषयी खरंच कुणाला खूप सहानभूती वाटत असेल तर त्यांनी शेतमालाला चांगला भाव मिळावा म्हणून, अडते आणि दलाल यांच्यामुळे होणारी शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबावी म्हणून धडपड करावी.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s