५ जून. जागतिक पर्यावरण दिन.

मित्रांनो,                                                               
मागे एकदा मी ” जागतिक चिमणी दिना ” विषयी
लिहिला होतं.

आठवतोय तुम्हाला तो दिवस ?

बरोबर. २० मार्च.

तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं कि चिमण्यांसाठी आपण आपल्या अवती भोवती धान्य पेरायला हवं. त्यामुळे चिमण्यांची संख्या वाढेल. पण चिमण्या हा एक घटक आहे पर्यावरणाचा.

आपल्या बेताल वागण्यामुळे चिमण्या प्रमाणेच इतरही अनेक सजीव नामशेष होऊ लागले आहेत. हे सजीव कधीही आपल्यावर अवलंबून नव्हते. आपणच त्यांच्या आधारे जगत आलो. पहाता पहाता प्रगत झालोत. पण आपली प्रगतीच आपल्याला एक दिवस मारक ठरणार आहे. कारण आपली प्रगती साधता साधता आपण करतो आहोत निसर्गाचा विध्वंस. पण हे थांबायला हवं असं आता साऱ्या जगाला वाटू लागलाय. म्हणून सारं जग पर्यावरण सुदृढ व्हावं यासाठी एक दिवस साजरा करतं. तो दिवस म्हणजे आजचा दिवस –
५ जून. जागतिक पर्यावरण दिन.                              
                                   
वरच्या चित्रातली मुलं पहिलीत. झाड त्यांच्या कानात एक गोष्ट सांगतंय. ती गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगिन.

आत्ताच हवी.

नाही रे बाळांनो. नंतर नक्की सांगिन.

हो हो मला माहिती आहे मी तुम्हाला मागे खूप वचनं दिली आहेत. तुम्हाला ते पावसाचं गाणं ऐकवायचं आहे. खूप गोष्टी सांगायच्या आहेत. पण थोडा धीर धरा. वेळ मिळेल तसं सारं सांगणार आहे.

 आज आपण फक्त जागतिक पर्यावरण दिनाविषयी बोलू.             

मित्रांनो आपण एवढी वृक्षतोड केली आहे कि काही दिवसांनी आपल्याला श्वास घेणंही अवघड होणार आहे.

झाड काय काय करतात माहिती आहे तुम्हाला ?

बरोबर ते आपल्याला ऑक्सिजन देतात. त्यालाच आपण प्राणवायू म्हणतो.

आणखी ?
अगदी बरोबर. ती आपल्याला सावली देतात, आपल्या घरासाठी लाकूड देतात, वय झाला कि स्वतःला चुली मध्ये जाळून घेतात.

पण या बरोबरच झाडा जेव्हा आपल्याला ऑक्सिजन देतात तेव्हा ती हवेतला कार्बनडाय ऑक्साइड हा वायू शोषून घेतात.  हा वायू ते त्यांच्या बुंध्यात साठवून ठेवतात. जेव्हा हा बुंधा जाळला जातो तेव्हा हा सारा कार्बनडाय ऑक्साइड पुन्हा हवेत मिसळला जातो. म्हणून झाड तोडू तर नयेच पण तोडल्यानंतर जाळू तर मुळीच नये.    

मित्रहो अक्कलराव झाडं लावायचं काम करतात. तुम्ही जाल का त्यांच्यासोबत ?

जाल म्हणताय. तुम्ही खरच खूप शहाणी मुलं आहात.

आणि नाही जमला तुम्हाला अक्कलरावांच्या बरोबर जायला तरी हरकत नाही. या पावसाळ्यात तुम्ही प्रत्येकानं एक झाड लावा. त्याला रोज पाणी घाला. त्याला छोटी छोटी तांबूस हिरवी पानं येतील ना मग पहा तुम्हाला किती छान वाटेल. ते झाड नव्हे तुमचंच इवलसं रूप वाटेल तुम्हाला.
तुम्ही एवढ केलंत ना कि मग आजचा दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागल्यासारखा वाटेल मला.

तुमचा अक्कलराव 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s