नको पुढारी………जय वारकरी.

कलमाडी म्हणजे मला आधी अमेरिकेन पोसलेला आणि आता अमेरिकेसह साऱ्या जगाला डोईजड झालेला दहशतवाद वाटतो. कोण हा कलमाडी ? कॉंग्रेसनीच याला मोठा केला. आणि यानं राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करून आमची पार जागतिक स्तरावर नाचक्की करून टाकली. कलमाडीच का आमचे सारे पुढारी असेच. भारत महासत्ता होण्याची दिवास्वप्नं हे पुढारी दाखवतात खरं. पण स्वातंत्र्यानंतरच्या साठीतच या पुढाऱ्यांनी या देशाचं पार कंबरड मोडलंय. अगदी जख्ख म्हातारा करून टाकली यांनी देश.

म्हणूनच मला आमच्या ढिसाळ राजकारण्यांपेक्षा………मतलबी पुढाऱ्यानपेक्षा पंढरीची वाट चालणारे वारकरी अधिक थोर वाटतात.
कुठलाही कुठलाही हकारा नाही, कुठलाही पुकारा नाही, आमची नेते मंडळी करतात तसलं ‘ चक्क जाम ‘ च आव्हान नाही. तरीही कुठल्या प्रेरणेन हि सारी मंडळी एकत्र येतात आणि विठूनामाचा गजर करीत पंढरपूरला जाऊन विठूला खऱ्या अर्थानं लेकुरवाळा करून सोडतात काही कळत नाही.

टाळ, चिपळ्या, मृदंग, पखवाज, पताका….आणि हरिनामाचा अखंड गजर. उन – वारा, पाऊस – पाणी कशा कशाची तमा न बाळगता कुटल्या आधारावर हि मंडळी दिवसभर वाटचाल करतात. नाही तर आम्ही. सिमेंटच्या अगदी पक्क्या भिंतींच्या घरात दोन दोन रजयात स्वतःला गुरफटून घेतलेलं असतानाही आम्हाला हुडहुडी भरून येते.

गेली शतकोन शतकं चाललेली हि परंपरा पहिली कि मला प्रश्न पडतो, कोण करतं या साऱ्याच नियोजन ?

त्यामुळेच आळंदीहून निघून विठ्ठल गजरात पंढरपूरला पोहोचणारी वारकऱ्यांची दिंडी पहिली कि मला वाटत जी मंडळी कुठल्या हि लोभाशिवाय गेली अनेक शतकं हि परंपरा चालवताहेत त्यांच्या हाती खरंच या देशाचं अर्थकारण द्यावं. ते निश्चित या देशाला पुन्हा खऱ्या अर्थानं प्रगतीपथावर घेवून जातील.

विठोबा माउली ऐकतोस ना ?

तूच तारणहार रे या देशाचं आता.

बघ बाबा कर काहीतरी……….

नको पुढारी………जय वारकरी.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s