फ्रेशर्स पार्टी : चुकलं कुणाचं ?

खरंतर अशाच वाट चुकलेल्या कोकरांसाठी नुकतीच मी बाबा ‘ हि कविता लिहिली होती आणि ब्लॉगवर टाकली होती. या फ्रेशर्स पार्टीमध्ये सहभागी झालेल्या  किंवा यापुढे सहभागी होण्याचा विचार असलेल्या एका जरी तरुणापर्यंत हि कविता पोहचली आणि माझ्या रसिक वाचकांबरोबरच मला त्यांचीही प्रतिक्रिया मिळाली तर मी  माझी हि कविता सार्थकी लागली असं समजेन.

फ्रेशर्स पार्टीमध्ये मुलांपेक्षा मुलीच जास्त होती !!!!!!! फ्रेशर्स

पार्टीमधल्या मुलींनी खूपच तोकडे कपडे घातले होते !!!!!!! फ्रेशर्स

पार्टीनंतर वर्तमानपत्रात झळकलेल्या बातम्यातल्या या प्रमुख ओळी !!!!!!!!

मागे सिंहगडाच्या परिसरात पार पडलेली ‘ रेव्ह पार्टी ‘ आणि परवाची थेऊरची ‘  फ्रेशर्स पार्टी ‘ दोन्ही पार्ट्यानंतर वर्तमानपत्रात रकानेच्यारकाने भरून आले. पण फलित काय ? चुकलं कुणाचं ? आईबाबांचं ? शिक्षकांचं ? कि मुलांचं ?

मी असं मानतो कि इथं मुलांचं खरंच फारसं चुकलं नाही ? चुकलं असेल तर आईबाबांचं ? चुकलं असेल तर शिक्षकांचं ? चुकलं असेल तर समाजाच ? चुकलं असेल तर आमच्या शासकीय यंत्रणेच ? आणि समजा मुलांचं चुकलच असेल तर पुढे आम्ही काय केलं ?

वर्तमानपत्रांनी त्यावर रकानेच्या रकाने लिहून त्यांची अब्रू चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला. चेहरे झाकत बाहेर पडणाऱ्या मुलींचे फोटो मुखपृष्ठावर झापण्यासाठी वर्तमानपत्रांनी बाह्या सरसावल्या. त्या बिचाऱ्या मुलींनी ज्या रीतीने चेहरे झाकण्याचा प्रयत्न केला ते पाहिलं तर प्रश्न पडतो ? खरंच त्यांनी लाज सोडली होती ? वर्तमानपत्रांना कोणी अधिकार दिला त्यांचे फोटो छापण्याचा ?

त्या घटनेचे चित्रण करताना सगळ्याच दूरचित्र वाहिन्यांना काय स्फुरण चढलं होतं ?

पोलिसांनाही आपण फार मोठी मर्दुमकी गाजवल्या सारखं वाटत होतं ?

आज एका वर्तमानपत्रात मी वाचलं कि जर सरकार दरबारी ७००० रुपये भरून परवानगी घेतली तर काही अडचण आली नसती. म्हणजे एवढ्या पैशात त्या  मुलांना अब्रू सोडून वागण्याचा परवाना मिळाला असता ? व्वा ! काय कायदे आहेत आमचे!!!!!

चीड येते या सगळ्या व्यवस्थेची.

हे सगळ घडल्यानंतर गरज होती त्या मुलांना झाकण्याची. म्हणजे त्यांना माफ करायला हवं होतं असं नाही म्हणत मी. पण त्यांना सजून घ्यायला हवं होतं.

समाजातल्या काही मनोस्पचार तज्ञांनी पुढं यायला हवं होते. त्या मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्या कृतीतली चूक दाखवून दयायला हवी होती. प्रेमाची भाषा प्राण्यांनाही कळते मग त्या मुलांना कळली नसती. पण नाही प्रेमापेक्षा आमची भिस्त कायद्यावरतीच अधिक. स्पर्शापेक्षा आमचा विश्वास छडीवर अधिक.

आणि ही मुलं तरी कोणाची, धनदांडग्यांचीच ना ? त्यांना माहित असत आपला बापही असाच पार्ट्या देत – घेत असतो. भ्रष्टाचाराच्या गटार गंगेत हात बुडवून पैसा ओढत असतो. कुछ उडाया तो क्या फर्क पडेगा ?

आज आमचा कोणता नेता, कोणता उच्च अधिकारी भ्रष्टाचारात गुंतलेला नाही. काय आदर्श घ्यायचा नव्या पिढीने त्यांच्याकडून ? शिक्षा व्हायला हवी असेल तर आई – बाबांना व्हायला हवी. शिक्षकांना व्हायला हवी. मुलांना नव्हे ?

5 Comments

  1. माझ्या मते साहसाचा थरार अनुभवण्याची स्वाभाविक मानवी प्रवृत्ती हे या कार्यक्रमाचे मूळ आहे. मानवी मर्यादांपलिकडे पाऊल टाकण्याचा प्रयत्न अधिक चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो वा होऊ शकतो याची जाणीव संबंधिताना करून देणे हा याच्यावरचा एकमेव उपाय आहे. त्याना बदनाम करणे हा नव्हे.

    • मनोहरजी, मला वाटत दारू पिणं किंवा मित्र मैत्रिणींसोबत नाच करणं हि व्याख्या कोणत्याच तरुनला मान्य नसेल. या कारण असेल तर संस्कारांची उणीव असा मला वाटत. हो पण तुमच्या पुढच्या विधानाशी मी पूर्ण सहमत आहे.

  2. तुम्हाला अभिप्रेत असलेले लिहून तुम्ही मोकळे झालात. पुण्यासारख्या ठिकाणी या मुलांना फ्रेशर्स पार्टी करायची होती तर मग ड्रेस कोड कशाला होता.. सर्व मुली आपल्या उघड्या नागड्या टांगा व पर्वत रांगा दाखवित होत्या. यांना मानसोपचाराची गरज नाही.. ही जास्तीची आलेली अक्कल आहे. नंगानाच सुरू असतांनां मिडीया तेथे आला तर चुकलं कोणाचं.. आणि हो.. फक्त ७००० रु. साठी पोलीस तेथे गेलेले नव्हते.. तर थेऊर गांवातील लोकांच्या तक्रारी वरून कार्यवाही करण्यात आलेली होती. या गोष्टींचे समर्थन करणे कधीही समर्थनीय नाही. मी पण एका वयात आलेल्या मुलीचा बाप आहे. मलाही काळजी आहे. फक्त मोठे अधिकारी, भ्रष्ट नेते यांचे मुलेच नाही तर कनिष्ठ मध्यमवर्गीयांची मुलेही सिंम्बॉयसीस मध्ये शिकतात. त्यांचा अपवाद कसा राहील. चुकलं कुणाचं.. तर आई बापाचं.. ज्यांना या माजलेल्या बैलांना दोर बांधता आलेला नाही.. बांधतीलही कसे .. काही जरी बोललातं. तर मरायची..घर सोडून जायची धमकी.. मगं..खरं सांगा चुकलं कुणाचं..?

    • दीपक, अभिप्रायाबद्दल आभार. मला अभिप्रेत असलेले लिहून मोकळा होण्याइतपत मी अविचारी नाही. माझं ‘ मला झाड व्हायचं ‘, ‘ बाबा ‘ , शेतकऱ्यांची रया ‘ , आई ‘ हे लिखाण या गोष्टींची साक्ष देईल. पण पार्टीला ड्रेस कोड होता हे तुम्हाला कसं माहिती ? वर्तमान पत्रात वाचूनच ना ? आपली वर्तमान पत्र राईचा पर्वत करून पानं काळी करण्यात किती तरबेज आहेत याची तुम्हाला जाणीव असेलच.

Leave a reply to Ganesh Cancel reply