ताजी कविता : एक व्याख्या

परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला सांगितलीय.” मोठेपण नाही सांगत पण या एवढ्याश्या पोरटयांनाही माझ्या कविता आवडतात आणि कळतात ही.

शालेय अभ्यासक्रमातले उपक्रमह असेच असतात. हे असं करावं हे त्यांना कुणी सांगतच नाही. फक्त हे करून आणा. मग मुलं बिच्चारी आणि शक्य असले तर पालकही ( बहुदा आया ) काहीतरी करून ते जुळवून आणतात. पुढे त्या उपक्रमांच काय होतं हे परमेश्वरालाच माहिती.

असो. खरंतर वर्गात कविता शिकवल्यानंतर मुलांनी स्वतःच कविता लिहावी असं बाईंना अभिप्रेत असणार. पण त्यासाठी कमीतकमी कवितेतलं यमक तरी मुलांच्या गळी उतरवायला हवं. एखाद कडवं वर्गातच मुलांना तयार करून दाखवायला हवं. पण मुलांवर एवढे कष्ट कोण घेणार प्रत्येकजण आपला पाटी टाकून घरी जाणार.

तर या मुली अशा माझ्या गळी पडल्या. एकीला डायरीत लिहिलेली एक कविता दिली. आता दुसरीला ती कविता नको होती. वेगळीच कविता हवी होती. ती म्हणाली, ” बाबा मला ताजी कविता हवी.” राज हट्टाचा जमाना गेला. पण बाल हट्ट आणि स्त्री हट्ट अजूनही आमची मान सोडायला तयार नाही. ( हे गमतीनं लिहिलंय बरं.) काय करणार ?

दिवस अगदी काल परवाचे. पावसाळ्याचे. बाहेर आभाळ भरून आलेलं. वीज गेलेली. मी अंधारातून भरलेल्या आभाळाचा वेध घेत बसलेलो. मग माझ्या मनात आलं, पाऊस जर शाळेत गेला तर ? आणि मग मी तिला म्हणालो, ” गुड्डी, चल. आपण तुझ्यासाठी नवी कविता तयार करू.” तीही अगदी उत्साहात माझ्या मांडीला मांडी लावून बसली. आणि बघता बघता पाहिलं कडवं तयार झालं.

एकदा एक पाऊस
शाळेमध्ये गेला
एका मागून एक त्याने
पाढे म्हटले सोळा.

तासभर लाईट नव्हते. त्यामुळं आमची बैठक मोडण्याचाही प्रश्न नव्हता. अंधारातच मी आपले शब्दांचे तीर मारत होतो. तीही अधून मधून मोडकी तोडकी साथ देत ओळी तयार करण्याचा प्रयत्न करत होती. ओळी तयार करण्यात रस घेत होती. आणि मग तासाभरानं आमची कविता तयार झाली.
ती छोटीशी पोर. ” मला बाबांनी ताजी कविता दिली.” म्हणत उड्या मारत पळाली. ती ही कविता _

Advertisements

1 Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s