हे म्हणे देशाचे आधारस्तंभ !

पगारवाढ हवी म्हणून संसदेत गोंधळ घालणाऱ्या या खासदारांमध्ये आणि पगारवाढीसाठी कंपनीच्या दारात धरणं धरणाऱ्या आमच्या सामान्य कामगारांमध्ये फरक तो काय ? आणि हे म्हणे देशसेवक ! हे म्हणे देशाचे आधारस्तंभ !
देशाचे हजार मार्गाने लचके तोडणारे हे. भूखंड खाणार, चारा घोटाळा करणार, सत्तेवर येण्यासाठी आमदार – खासदारांची खरेदी विक्री करणार,  बोफर्स आहेच…………सैनिकांचे बूट खरेदी करताना ते कुरतडून त्यातही लाच खायला हे विसरले नाहीत. राष्ट्रकुल स्पर्धेतल्या भ्रष्टाचाराच प्रकरण तर किती ताजं आहे !
प्रत्येक बाबतीत त्यांचं कमिशन ठरलेलं……….टक्का ठरलेलं. मग यांना पगारवाढ हवीच कशाला ?
आजकाल मंत्र्यांनी कोणतेच निर्णय घेऊ नयेत अशी परिस्थिती आली आहे. कारण कोणताही निर्णय घेताना हि मंडळी स्वतःचा स्वार्थ पहाणार……… आपल्याला चरायला कुरण मिळतंय कि नाही याची खातरजमा करणार. यांनी विविध माध्यमातून जनतेची मतं मागवावीत आणि त्या आधारावरच कुठलही विधेयक लागू करावं.
बरं ! आहे या पगारात यांचं भागत नाही असं समजावं तर निवडणूक काळात उधळायला कोट्यावधी रुपये हे आणतात कोठून ?
त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे लोकसभेत ठराव मांडून स्वतःची पगारवाढ करायचा हक्क यांना दिलाच कोणी ? हे म्हणजे एखाद्या कंपनीच्या कामगारांनीच त्यांच्या पगारवाढीचा निर्णय घेतल्यासारख झालं. यांना पगारवाढ हवीच होती तर यांनी विविध माध्यमातून जनतेचे निर्णय मागवायला हवे होते. किंवा राष्ट्रपतींनी या संदर्भात निर्णय घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करायला हवी होती. पण स्वतःची तुंबडी भरू पहाणाऱ्या आमच्या लोकप्रतिनिधींना एवढी सुबुद्धी असणार कशी ?
खरंतर देशभरातल्या वर्तमानपत्रांनी, दुरचित्र वाहिन्यांनी या संदर्भात रान पेटवला असतं तरी हे देशावरच ओझं टाळता आलं असतं. पण अलिकडची पत्रकारीकता हि देशभक्तांची नव्हे, ती याच चोरांच्या दावणीची गाय आहे. मग ती यांच्या विरुद्ध हंबरणार कशी ?
म्हणूनच मित्र हो एक ना एक दिवस आपल्यासारख्या सामान्य माणसालाच रस्त्यावर यावं लागणार हेच खरं. तयार रहा.

Advertisements

2 Comments

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s