तिचं हसू

ती आपल्या आयुष्यात येते………तिचं हसू आपल्यावर उधळून देते………आणि आपण ???????????
………आपण आपले उरतच नाही मुळी.

त्यानंतर एकच आस………..सगळीकडे तिचे भास…………सोबतीला तिचा श्वास……………..वैशाखातही श्रावणमास.

तिचं हसू असतं……………अगदी इवलसं………..तिच्या ओठांच्या दोन कोपरयात मावणारं………….पण आपल्या आयुष्यातलं सारं आभाळ व्यापणार.

पण तिला जाणीवही नसते या साऱ्याची……ती तिच्याच धुंदीत……..चेहऱ्यावरचं हसू उधळीत तिच्या दारातल्या केवड्याला पाणी घालत.

तिचं हसू आपलं सारं आयुष्य व्यापून उरलं आहे याची जशी तिला जाणीव नसते तशीच तिच्या दारात फुललेल्या तळहाताएवढ्या केवड्याचा दरवळ आपल्या अंगणात पसरलाय आणि त्या दरवळानं आपण पुरते मंत्रमुग्ध झालेलो आहोत याचीही जाणीव तिला नसते.

ती जाणीव करून देण्याचाच हा छोटासा प्रयत्न –

Advertisements

4 Comments

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s