मनपूर्वक शुभेच्छा

मी गेले दोन महिने लिहित नव्हतो. तरीही माझे अनेक वाचक नियमितपणे माझा ब्लॉग ओपन करत होते. त्यात देवेंद्र होता, सुजित होता, आकांक्षा होती, विशाल होता, आणखी कितीतरी नावं लिहिता येतील. पण कुणा कुणाची आणि किती नावं लिहिणार ? आणि इतरांची नावं लिहिली नाहीत म्हणून मला त्यांचा विसर पडलाय असही होत नाही. मित्रहो तुम्ही नुसताच माझा ब्लॉग वाचवा, छान म्हणावं, माझ्या लिखाणावरच्या तुमच्या  प्रतिक्रिया पहाव्यात म्हणून नाही लिहित काही मी ?

राष्ट्रकुल स्पर्धेची सांगता खूप छान झाली असं म्हणत तिला सुरवातीला लागलेलं भ्रष्टाचाराचं गालबोट पुसण्याचा प्रयत्न झाला खरा. पण आमच्या देशातला भ्रष्टाचार म्हणजे चंद्रावरचा डाग आहे. तो पुसून टाकायचा असेल तर आम्ही साऱ्यांनी जागं व्हायला हवं.

” क्रांती सामान्य माणसच करतात. पुढारी नव्हे हे. ” लक्षात घ्यायला हवं.

कदाचित आता आपल्याच लोकशाही विरुद्ध आपल्याला एखादं रामायण घडवावं लागेल………….. एखादं महाभारत रचावं  लागेल………….एखादं पानिपत लढावं लागेल…………..एखादा सत्याग्रह करावा लागेल; पण मित्रांनो आपल्या लोकशाहीतला कचरा आपल्याला कडून टाकायलाच हवा. म्हणून हा सारा लेखन प्रपंच.

असं असूनही इतके दिवस का लिहित नव्हतो मी ते कळेलच तुम्हाला लवकर. आज नाही सांगत. आज तुम्हा साऱ्यांना दसऱ्याचा मनपूर्वक शुभेच्छा.

Advertisements

1 Comment

  1. राष्ट्रकुल स्पर्धांवर इतक्या पद्धतशीरपणे गदारोळ उठण्यामागे कोणाचा स्वार्थ होता याचा विचार करण्याची गरज आपल्याला वाटत नाही याचे आश्र्चर्य वाटते. मी भ्रष्टाचाराच्या विरोधात असलो तरी माझा प्यादे म्हणून वापर होऊ देणार नाही.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s