गाईचं शेण आणि सत्वयुक्त अन्न

आम्ही प्रगतीच्या किती गप्पा मारतो. चंद्र, सूर्य, तारे सारं अगदी काखेत घेऊन फिरल्यासारखे वागतो. टि.व्ही. काय ? ………. इंटरनेट काय ?…………फोन काय ?…………मोबाईल काय ?……..शॉपिंग काय ?………हॉटेलिंग काय ?…….फास्टफूड काय ?……..चायनीज काय ? हेच आमचं लाईफ………..हीच आमची जीवनशैली……..!!!!! वामनानंतर एका पावलात पाताळ आणि दुसऱ्या पावलात आकाश पादाक्रांत करण्याची क्षमता आणखी कुणात असेल तर ती फक्त आमच्यात. केवढी प्रगती केलीय आम्ही ! पण एवढ्या प्रगतीनंतरही आम्हाला मिळणारं अन्न सत्वयुक्त आहे कि नाही ??? असा प्रश्न कधी पडलाय आम्हाला .

नाही ना !!!!!!! नाहीच पडणार. लाईफ है …..एश है…..बस्स !!!!!! आमच्या जगण्याला दुसर काही कारण नकोच आहे.

नको नको ते रोग………… उपटसुंभासारख्या उपटणारया आणि आमच्या आयुष्याला जळमटासारख्या चिकटणारया कसल्या कसल्या व्याधी ………..अकाली पांढरे होणारे केस……….वयाच्या पंचविशीतही ह्र्द्यरोगाच्या झटक्यानं येणारं मरण……..आजकाल कुठल्या रोगाची भीती वाटत नाही आम्हाला??????………थंडी, ताप, खोकला, ठसका ……..असं जरा काही झाला कि आमचा जीव घाबरागुबरा होतो.फार कशाला, अहो काल परवा आलेला तो ” स्वाइन फ्लू ” पण त्यांना सुद्धा आमचं जीण हराम करून टाकलय. असल्या तसल्या कुठल्याही फुटकळ व्याधीन मरणारी माणसं पहिली तर तुम्हालाही प्रश्न पडेल, ” आम्हाला मिळणारं अन्न सत्वयुक्त आहे कि नाही ??? ” या माझ्या प्रश्नापुढं मी तीनच प्रश्नचिन्ह देऊन थांबलोच कसा. खरंतर या प्रश्नापुढं असंख्य प्रश्नचिन्ह दिलीतरी ती अपुरीच पडतील.

मी मुळात ग्रामीण भागातला. गाईच्या शेणाचा आणि माझा फार जवळचा संबंध. तांबडं फुटताच उठून आम्ही शेणकुर करायचो. गुरामाग गेलो कि वढ्याला पडलेले त्यांचे शेणाचे पोव घरी न्यायचो. सहाजिकच त्या शेणाच्या पोवाचा एक निसर्गदत्त आकार माझ्या चांगलाच परिचयाचा आहे. त्या शेणाच्या पोवातून निघणाऱ्या गरम वाफा मी फार जवळून अनुभवल्या आहेत. त्या शेणाच्या पोवाचा मनाला उल्हासित करणारा गंध माझ्या मनात कालपरवापर्यंत जसाच्या तसा होता.

शिकलो…….शहरात आलो. ऑफिसर झालो आणि गाईच्या शेणाला दुरावत गेलो.

पण दोन एक  महिन्यापूर्वी माझ्या वडिलांना देवाज्ञा झाली आणि त्यांचे अंतिम संस्कार करताना अनेक वर्षांनतर माझा गाईच्या शेणाशी जवळून संबंध आला.

झालं असं ! वडिलांना ज्या ठिकाणी अग्नी दिला ती जागी शेणाचा सडा शिंपडायचा होता. कुणीतरी बादलीत गाईची शेण दिलं. आणखी कुणीतरी त्यात पाणी ओतला आणि ती बादली माझ्या हाती दिली. मी शेण कालवू लागलो आणि एक अगदी नकोसा दर्प माझ्या नाकात शिरून मला कासावीस करू लागला. पण पर्याय नव्हता त्यामुळे तो दर्प तसाच सहन करून सडा शिंपला. बादली रिकामी झाली. पण शेणानं बरबटलेले हात कधी  एकदा धुऊन टाकतोय असं मला झालं होतं.

ही गाय शहरातली होती हे सुज्ञास सांगणे न लगे. गाईच्या शेणाला हा नकोसा दर्प तिला शहरात मिळणाऱ्या नीकस अन्नामुळेच येत असावा हे सांगायला कुण्या शास्त्रज्ञाची गरज नाही.

आता सांगा शहरात आम्हाला मिळणारं अन्न तरी  सत्त्वयुक्त असेल याची खात्री देवू शकताय तुम्ही ? जर आमची प्रगती आम्हाला सत्वयुक्त अन्न देऊ शकत  नसेल तर मग त्या प्रगतीचा फायदा काय ??????????????

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s