महिला विधेयक आणि झाशीची राणी

हा ही लेख तसा जुनाच. पण माझ्या नव्या वाचकांसाठी नव्यानं टाकतोय. संपलो वगैरे काही म्हणू नका. वेळेची खूपच अडचण होते आहे. एवढच.

**************************************************************************************

मागे संसदेत महिला विधेयक पास झालं आणि आमच्या गल्लीतल्या बायकांनी हत्ती घेवून साखर वाटली. हो ! हत्ती घेवूनच. हत्तीवरून नव्हे. कारण हत्तीवरून साखर वाटण्यासाठी हत्ती आणायला हवा होता. त्यासाठी पैसे हवे होते आणि ते त्यांच्या आवाक्यात नव्हते. म्हणून त्यांनी भोंडल्यातला हत्ती एका हातात घेतला, साखरेची वाटी दुसऱ्या हातात घेतली आणि निघाल्या साखर वाटत.

कित्येक आयाबायांना हे काय चाललाय काही कळत नव्हतं. त्यामुळे साखर हातावर पडली कि त्या विचारायच्या,” काय हो ताई, हे आणि कशापायी ?”

“काही नाही हो. महिला विधेयक पास झालय ना, म्हणून .”

“म्हंजी काय झालं ?.”

“म्हणजे आता महिलांना ३३ टक्के जागा राखीव मिळणार.”

“त्यामुळे काय होईल ?”

“काय की बाई. पण आत्ता साखर घ्या आणि जावूद्या आम्हाला पुढं.”

“बर झालं बाई महिला विधेयक पास झालं ते. हे असं काहीतरी झालं म्हणून कुणीतरी आपल्या हातावर साखर तरी ठेवतय. नाहीतर कुणी आपल्या हातावर चिमुटभर माती ठेवत नाही.”

संसदेत महिलाविधेयक पास झाल्याची बातमी स्वर्गातही पोचली. आणि सारे कमरेत वाकून खाली संसदेकडे पाहू लागले.

स्वर्गात झाशीची राणीही होती. तिनं हे सारं पाहिलं आणि गेली दीड शतकं म्यान करून ठेवलेली तलवार म्यानातून खसकन उपसली आणि म्हणाली,” हे विधेयक पास करणाऱ्या एकेकांची मुंडकी छाटून त्यांच्या हातावर देते. अरे मी भांडले, लढले इंग्रजांशी. दत्तक वारस घेतला. इंग्रजांनी त्यावर आक्षेप घेतला. इंग्रज काही ऐकेनात.शेवटी मी तलवार हातात घेतली. प्राणपणान लढले त्यांच्याशी. तेव्हा काही कुणी कसलं आरक्षण लागू केलं नव्हतं. कर्तुत्वाला कधीच आरक्षणाची गरज भासत नाही. हे आरक्षण म्हणजे राजकारण्यांनी मतदारांसमोर टाकलेला तुकडा आहे हे आजच्या मतदारांना कधीच कळणार नाही. रयतेच्या डोळ्यात अशी धूळफेक करणाऱ्या राजकारण्यांना माझ्या तलवारीच पाणी पाजायलाच हवं.”

बॉरीस्टर जिनाही स्वर्गात होते. त्यांना खूपच हळ हळ वाटली. ते म्हणाले, ” या खुदा ! मी भारत पाकिस्तान फाळणी करून फारच मोठी चूक केली. मी जर तसं केलं नसतं तर आज माझ्या बहु बेटीयांहि याची फळ मिळाली असती.”

गांधीजींच्या कानावर हि बातमी पोहोचली तेव्हा त्यांनी हात जोडले आणि मनातल्या मनात पुटपुटले, ” हे सीता !!!!!!!!”

गांधीजी असं मनातल्या मनात पुटपुटले तरी शेजारी उभ्या असलेल्या सावरकरांना ते ऐकू गेलंच आणि अचंबीत होत त्यांनी विचारलं, ” महात्माजी, ‘ हे राम ‘ म्हणता म्हणता आज अचानक सीतेवर कुठे घसरलात ?”

“ अरे तुला माहित नाही का ? संसदेत महिला विधेयक पास झालंय आणि महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळालय. तेव्हा आता मला सदुसष्ट वेळा रामाचं स्मरण केलं कि ३३ वेळा सीतेचे स्मरण हि कराव लागणार.”

बाबासाहेबांच्या कानावर हि बातमी गेली. ” शी !!! खरं तर किती उदात्त हेतूने मी माझ्या समाजासाठी तेव्हाच्या घटनेत आरक्षणाची मेख ठोकली होती. पण हि आत्ताची मंडळी उठसुठ आरक्षणाची खिरापत वाटत सुटले आहेत. मी जर तेव्हाच आरक्षणाची टूम काढली नसती तर आजच्या ह्या स्वार्थी राजकारण्यांना ‘आरक्षण ‘ हा शब्द कुठल्याही शब्दकोषात सापडला नसता. मग त्यांनी आज आरक्षण कसं लागू केलं असतं.” असं म्हणत ते चरफडत राहिले .

पी. व्ही. नरसिंहराव मात्र जाम खूष होते. खास बनारसी पेढे घेवून ते स्वर्गात सगळ्यांना वाटत होते. कुणी कुणी विचारायचे की, ” पी. व्ही. महिला विधेयक पास झालंय आणि तरही तुम्हाला एवढा आनंद का झालंय ?”

“आरे यार, सिधीसी बात है ! आता माझा वार्ड राखीव झाला तर माझ्या मुलाला नाहीतर सुनेला, सुनेला नाहीतर नातीला अस माझ्याच घरातल्या कुणालातरी तिकीट मिळेल ना. आरे, आमची कॉंग्रेसची मंडळी खरंच धूर्त आहेत. कसे एका दगडात दोन पक्षी मारलेत पाहिलात.” असं म्हणताना ते समोरच्याच्या हातवार चुकून एका ऐवजी दोन पेढे ठेवायचे.

समोरचा प्रामाणिकपणे सांगायचा, ” पी. व्ही. आरे, तुम्ही दोन पेढे दिलेत .”

“असू देत. मी नाही का एका वेळी दोन दोन खाती सांभाळायचो. आणि तुम्हाला दोन पेढे जड वाटताहेत ?”

समोरचा मनातल्या मनात पुट पुटायचा, ” कातडी कातडीत फरक असतो नरसिंहराव.”

समोरच्यानं असं पुटपुटलेलसुद्धा पी. व्ही. ना ऐकू गेलेलं असायचं. पण काय ऐकायचं आणि काय सोडून द्यायच यावर तर पी. व्हीं. ची कारकीर्द पार पडली होती. साहजिकच ते दुर्लक्ष करून पुढ निघून जायचे.

खरंच महिला विधेयक काय आहे ? हे किती महिलांना माहित आहे. ते कुणीच आमच्या महिलांना समजावून सांगत नाही. अगदी प्रसिद्धी माध्यम सुद्धा त्याविषयी योग्य माहिती पुरवत नाहीत त्यांना फक्त पराचा कावळा कसं करायचा आणि पेपर कसं भरायचा. एवढच येत.

असो. तर इकडे आमच्या गल्लीतल्या बायका साखर वाटत होत्या. साखर वाटून वाटून त्यांचे हात दुखू लागले. पायातल्या चपला झिजल्या. वाटीतली आणि घरातल्या डब्यातली हि साखर संपली .

“आता काय कराव बाई ? अजून किती तरी जणींची तोंड गोड करायची आहेत ?” या प्रश्नावर साऱ्याच गोंधळून गेल्या .

“काही नाही आज प्रत्येकीने आपल्या नवऱ्याच्या पगारातली ३३ टक्के रक्कम आणायची. त्या पैशाची साखर खरेदी करून पुन्हा साखर वाटत सुटायचं.”

संध्याकाळी बाबुराव घरी आले. पगार खिशात होता. सुलभताईनी आज त्यांचं हसत स्वागत केलं नाही. त्यांच्या हातातला डबा घेतला नाही. त्यांच्यासाठी स्टोव्हवर चहाच आधण ठेवल नाही. त्यांनी सरळ बाबुरावंकडे ३३ टक्के पगाराची मागणी केली.

“ हे आज एकदम तेहतीस टक्क्याच काय सुचलंय ?”

“आहो, आज संसदेत महिला विधेयक पास झालंय. महिलांना तेहतीस टक्के आरक्षण मिळालाय.”

“हे पहा तेहतीस टक्के आरक्षण तुम्हाला हवं तर घरातल्या जागेत मिळेल. खिशातल्या पगारात नाही.” असं म्हणत बाबूरावांनी पगाराच्या खिशावरचा हात अधिक घट्ट केला .

Advertisements

2 Comments

  1. “सीतेवर कुठे घसरलात?” हे वाक्य वाचून वाईट वाटल. कारण आजही सीतेचा उल्लेख सीतमाता किंवा सीतमाई असाच केला जातो. उपहास किंवा विनोद करण्याच्या ओघात असल काहीतरी लिहीन चुकच आहे. तरी कृपा करून असली वाक्य टाकु नयेत ही नम्र विनंती. – तुमचा एक नवीन वाचक. प्रतिक्रिया द्यावी वाटली म्हणून लिहिल. राग मानू नये. आवडली नसेल तर delete करू शकता.

    • दिनेशजी, अभिप्रायाबद्दल आभार. ‘ राम ‘ हा शब्द दोन अक्षरी आहे म्हणूनच ‘ सीता ‘ असा उल्लेख करावा लागला. यात कुठेही कुणाचाही उपमर्द करण्याचा हेतू नव्हता. कित्येकदा ती लिखाणाची गरज असते. एवढा समजून घेतलंत तर बरं होईल.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s