हीच का आमची लोकशाही ?

हेच ……हेच नको असतं मला. विलासराव गेले…………अशोकराव आले. काय केलं त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत माहित नाही ! पण झाले बळीचा बकरा. किती ठामपणान त्यांनी परवाच विधान केलं होतं कि, ” माझ्या दूरच्या नातेवायकांनी काय निर्णय घ्यायचे हा त्यांचा प्रश्न आहे. मी दिल्लीला निघालोय ते वेगळ्या कारणासाठी. ”

झालं. अशोकराव दिल्लीला गेले आणि राजीनामा देऊन मोकळे झाले. किती ढिसाळ राजकारण आमचं. एक दुसऱ्याला खाली ओढतो……….सत्तेच्या वारूवर स्वर होतो. भोवतीन हजारो टपलेलेच असतात, ‘ याला कसं खाली ओढता येईल ‘ याची वाट बघत. राजकारणात गेलेला माणूस ग्रह फिरल्यावर ‘ बाबाही रहात नाही आणि बाईही रहात नाही.’ अशावेळी तमाशातला आमचा सोंगाड्याही अधिक पावरबाज वाटायला लागतो. 

परवाच सोनियांच्या मेळाव्यासाठी दोन कोटी दिल्याच्या प्रकरणात अडकता अडकता अशोकराव वाचले होते. महिनासुद्धा झालं नाही त्या घटनेला. आज आलीच गच्छन्ति. काय अधिकार सोनियांना अशोकरावांचा राजीनामा मागण्याचा ? पण विचारणार कोण कुणाला ? आणि समजा विचारलं तरी उत्तर मिळेल, ” छे, छे ! आम्ही नाही काही राजीनामा मागितला. त्यांनीच हे ओझं आपल्याला पेलत नाही असं सांगत राजीनामा दिला.” हे सारच असंच आहे. विलासरावांना पायउतार व्हायला लावून तुमच्या ध्यानीमनी नसताना आम्हीच तुम्हाला त्या सिंहासनावर बसवलं. मग आता आम्ही सांगतो आहोत तर द्या राजीनामा.

ही आमची लोकशाही. सत्तेत यायचा अधिकार तुम्हाला आहे पण सत्तेवर रहायचा अधिकार मात्र तुम्हाला नाही. मालकांना पेकाटात लाथ घातल्यावर कुत्र्यांना जसा क्यॉव………क्यॉव करत तुम्ही वळचनीला पडाव तसा आपला तुम्ही आमचा पुढचा आदेश मिळेपर्यंत गप्पं पडून रहावं.

आणि आम्ही म्हणतो आमच्या देशात लोकशाही आहे. काय केलं विलासरावांनी ? काय करू शकतात अशोकराव ? माझ्यावर अन्याय होतोय असं म्हणत न्याय मागू शकतात ? नाही ना ? मग कशाला म्हणायचं आम्ही व्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहोत म्हणून.

अरे खरच जर एखादा नालायक असेल तर त्याला सत्तेवरून खाली खेचायचा अधिकार मतदारांनाच द्या ना. पण नाही आमचं शासन तसं करणार नाही. कारण असे जर सामान्य मतदारांच्या हाती

अधिकार दिले तर ‘ हायकमांडच्या ‘ अस्तित्वाला धक्का नाही का पोहचणार ?

इथ गारुडला महत्त्व नाही. गरुड वाजवणाऱ्याला अधिक महत्त्व आहे. मनमोहन काय आणि अशोकराव काय वळ आली कि गप्पं टोपलीत जावून बसतात.

Advertisements

1 Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s