शुभेच्छा परत घ्याव्याशा वाटताहेत.

मित्रहो,

सॉरी. पण परवाच तुम्हाला दिलेल्या दिवाळीच्या शुभेछा मला परत घ्याव्याश्या वाटताहेत. त्याला कारण अनेक आहेत.

महागाई……भ्रष्टाचार……वगैरे तर आमच्या पाचवीलाच पुजलेलं आहे. परवाच भेसळयुक्त खव्याच प्रकरण अजून खूप ताजं आहे. पण तुम्हाला दिलेल्या शुभेछा परत घ्याव्याश्या वाटायला काही तेवढाच कारण नाही. आजच सकाळी ‘ पुणं फटाकेमुक्त होऊ पहातंय ’ असं कुठंतरी वाचलं. संध्याकाळी लक्ष्मीपूजन उरकून रस्त्याला गेलो तर, रस्त्यावर हे धुराचे लोटच्या लोट उसळलेले मी पहायले.

 

तो धूर पाहून मीच इतका हबकून गेलो कि त्याक्षणी हा विषय मनात येवून गेला. तो धूर इतका दाट होता कि, हा धूर कि पहाटेच धुकं ? असं प्रश्न पडावा. पण  वातावरणात पसरलेल्या वासानं जाणीव करून दिली कि हे धुकं नाही, धूरच आहे.

हा धूर इतका दाट होता कि, आठवी नववीत कुठंतरी विज्ञानाच्या पुस्तकात Acid Rain ( आम्लयुक्त पाउस ) विषयी काही तरी अभ्यासाला होतं त्याचं स्मरण झालं. वाटलं आत्ता या क्षणी पाउस पडला तर आपल्याला दारूयुक्त ( फटाक्याची ) पाउस पहायला आणि चाखायला मिळेल. त्यानं नशा येईल कि जीव जाईल हे अलाहिदा.

 

याचा अर्थ ‘ फटाके उडवूच नयेत ‘ असं मी मुळीच म्हणणार नाही. पण आपल्या थोडं तारतम्य बाळगायला हवं. फटाके उडवण्याचा…….फटाक्यांच्या आतषबाजीचा आनंद जरूर घ्यावा पण तो आनंद जीवघेणा ठरणार नाही हेही पहायला हवं.

पण आम्ही नेमकं याच्या उलटं करतो आहोत. फटाके उडवताना आम्ही भोवतालचं भान विसरून आमच्या आनंदातच मश्गुल होतो. आणि आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतो आहोत हे विसरून जातो आहोत.

दिवाळी आणि दिवाळीतले फटाके काही मी पहिल्यांदाच अनुभवत नाही. पण इतक्या दाट धुराचा अनुभव मात्र पहिलाच. पूर्वीच्या   फटाक्यांचा आवाज अधिक यायचा पण धूर कमी व्हायचा. आता फटाक्यांची रंगीबेरंगी आतषबाजी होताना आवाज कमी येतोय पण धूर अधिक होतंय. आम्ही आवाजाच्या प्रदुषणापासून सुटका करून घेताना हवेच्या प्रदुषणाच्या विळख्यात सापडतोय.

आपण जर स्वतःला आवरलं नाही तर माझ्या शुभेच्छा म्हणजे फुसका बार ठरतील. म्हणून तुम्हाला दिलेल्या शुभेच्छा मला परत घ्याव्याशा वाटताहेत.

आता सांगा इच्छा नसतानाही तुम्हाला दिलेल्या शुभेछा परत घेताना माझा काही चुकतंय ???????????

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s