त्याची मिशी……..त्याचा डाय

पूर्वीचे आजार कसे होते ?  – पटकी काय ?……..प्लेग काय ?…….देवी काय ? साथीच्या या अशा कितीतरी रोगांची आपण पार मन मोडली. पण आता भलतेच आजार येऊ लागले आहेत. त्यात नखांचे आहेत………..त्वचेचे विकार आहेत……………केसात रक्त नसतं………पण त्या केसांचेही आजार आहेत. म्हणून तर टि. व्ही. ढीगभर शाम्पूच्या आणि कसल्या कसल्या जाहिराती दिसतात.

अकाली पांढरे होणारे केस हा ही एक आजारच आहे. तो कशामुळे होतो ते ते आपल्याला शोधून काढता आलं नाही म्हणून आपण केसांना रंग देतो. त्यालाच डाय करणं म्हणतात.

मी स्वतः वयाच्या तिशीपासून डाय वापरतो आहे. साधरण पंधरा एक दिवसातून डाय करतो. माझं सोडा…….अहो, चार सहा वर्षाच्या मुलाच्याही डोक्यात पांढरे केस मी पहिले आहेत.

केसांना डाय करणारे बरेचजण मिशांनाही डाय करतात. काही दिवसांनी रंग उडतो…..पुन्हा मिशा डाय केल्या जातात.

अशाच एकानं डाय केलेल्या काळ्याभोर मिशा पाहून दुसरा त्याला म्हणाला, ” काय आज मिशा डाय केल्या वाटतं ?”

खरंतर असा खोचक प्रश्न विचारणाऱ्याला, ” तुझ्या मिशा पांढऱ्या झाल्या आहेत. तू आता म्हातारा झाला आहेस.” असाच म्हणायचं असतं.

त्या प्रसंगी मला विचार पडला, ” काय करायचं या बाकीचांना या फंदात पडून. अरे त्याची मिशी त्याचा डाय. तुम्हाला काय फरक पडतो त्यांना मिशी डाय केली काय आणि ती पांढरी पडली काय. आणि त्याच्या मिशा पांढऱ्या आहेत म्हणून त्याला म्हातारा ठरवायची तुम्हाला गरजच काय ? आणि मिशा पांढऱ्या झाल्या म्हणून काही कुणी म्हातारा होत नाही. म्हातारपण अवलंबून असतं मनावर….पांढऱ्या मिशांवर नव्हे. ज्याच्या मनात उमेद असते तो वयाच्या सत्तरीतही तरुणाच असतो.

या साऱ्या विचारांच्या गर्तेतून आकाराला आलेली हि कविता.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s