माझ्या मराठी देशाला

हि कविता सात समुद्रापलीकडे असूनही मराठीवर प्रेम करणाऱ्या मराठीशी असलेले ऋणानुबंध जपणाऱ्या तमाम रसिकांना अर्पण.

हि साता समुद्रापलीकडं गेलेली माणसं मराठीवर जीवापाड प्रेम करताना पाहून खूप खूप बरं वाटतं.

नाही तर आम्ही राहतो हिंदुस्थानात आणि तळवे चाटतो इंग्रजीचे आम्ही म्हणजे अगदी मी सुद्धा.

माझीच गोष्ट सांगतो. परवा ग्रामीण भागातल्या एका एम. इ. बी. सी. अधिकाऱ्याशी बोलण्याचा योग आला. नाव तिवारी………….अहमदाबादी किंवा लखनोवी. तो त्याच्या लखनोवी हेलात मराठी हाणत होता आणि मी त्याच्यावर इंप्रेशन मारण्याच्या हेतूनं इंग्रजी झाडत होतो.

महाराष्ट्रात शासनानं पहिली इयत्तेपासून इंग्रजी सक्तीची केली तेव्हा मीच लिहिलेली कविता मला आठवली आणि माझी मलाच लाज वाटली.

अधूनमधून इंग्रजी हाणणं आम्हाला आमच्या विद्वत्तेच प्रतिक वाटत. पण आपल्याच मराठी भाषेतून बोलताना आम्हाला अभिमान का नाही वाटत ? लाज वाटते मला आपल्या मातृभाषेवर प्रेम न करता स्वतःला हिंदुस्थानी म्हणवणाऱ्यांची.

गेल्या सात आठ महिन्यापूर्वी जेव्हा मी ब्लॉग लिहायला सुरुवात केली तेव्हा माझ्या ब्लॉगला एवढे वाचक भेटतील असं मला स्वप्नातही वाटला नव्हतं.

त्याही पेक्षा अप्रूप वाटलं ते देशोदेशीचे झेंडे माझ्या ब्लॉगवर झळकू लागले तेव्हा. मराठी माणूस जावून जाणार कुठे फारतर अमेरिका, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया नाहीतर दुबईपर्यंत. पण मला ज्ञातही नसलेल्या दोन…………चार…………..सहा………..आठ नव्हे तर चक्कं सोळा देशात पोहचलेला मराठी माणूस पाहून खूप खूप बरं वाटलं. ही कविता खास त्यांच्यासाठी –

Advertisements

2 Comments

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s