भ्रष्टाचाराचा महिषासुर

आज एक मेल आलेली. विषय नेहमीचाच भ्रष्टाचार. स्विस बँकेतल्या एका अधिकाऱ्याच विधान –

“ Indians are poor but India is not a poor country”. Says one of the Swiss bank directors. He says that “280 lacs crore (280,00,000,000,0000) of Indian rupees is deposited in Swiss banks, which can be used for ‘taxless’ budget for 30 yrs.”

” भारतीय गरीब आहेत. पण भारत गरीब नाही. स्विस बँकेत भारतीयांचे २८० लाख करोड ( २८०,००,०००,०००,०००० )रुपये पडून आहेत. एवढ्या पैशात भारताची अर्थव्यवस्था भारतीयांवर एक पैशाचाही कर न लादता चालू शकते. ”

त्यांनी आणखी काही शक्यता व्यक्त केल्या होत्या –

१) या पैशातून ६० कोटी भारतीयांसाठी रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
२) या पैशातून प्रत्येक भारतीयाला
प्रत्येक महिन्याला सतत ६० वर्षे २००० हजार रुपये मिळू शकतात.

हीच मेल माझ्या एका मित्राला आलेली.

त्यानं विचारलं, ” वाचली का रे ती मेल ? ”

” हो. ”

” केवढा हा भ्रष्टाचार ? ” माझा मित्र.

” हो. पण करतो काय आम्ही भ्रष्टाचार रोखण्यासाठी ?”

तो गप्प.

हा छोटासा लेख वाचल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय असेल हे पाहायचंच आहे.

पण मित्रांनो नुसत्या प्रतिक्रियाही महत्वाच्या नाही आपण पेटून उठायला हवं. ह्या पुढाऱ्यांच्या मुसक्या आवळायला हव्यात.

भ्रष्टाचार तुम्ही मी करत नाही. आमच्या यंत्रणेतले बहुतेकजण भ्रष्ट आहेत. मग तो शासकीय अधिकारी असो अथवा पुढारी.

या साऱ्याच मी मांडलेला गणित –

प्रत्येक भारतीयाला सरासरी २ लाख रुपये वाट्याला येतील. अर्थात आपण प्रत्येकजण लखोपती होऊ.

पण लाख रुपये नकोत आम्हाला ………..आम्हाला हवं आहे स्वच्छ प्रसाशन.

ते कोणी देणार नाही मित्रहो आपल्याला. हे मतलबी पुढारी तर मुळीच देणार नाही. ते आपलं आपणच मिळवायला हवं.
त्यासाठी मनामनात पेटायला हवेत वणवे –

वणवा
मनामात पेटायला हवी होळी
त्या होळीचा व्हायला हवा वणवा
स्वः म्हणताच
त्या वणव्यात पडायला हवा एकेक पुढारी
नंतर शासकीय अधिकारी
मग आमच्यातल्याच
स्वार्थाचा आणि लोभाचाही घास घ्यायला हवा त्या वनव्यानं
तेव्हाच खऱ्या अर्थानं
माणुसकीला जाग येईल
मातीच्या कुशीतून पुन्हा
एक नवी पहाट जन्म घेईल.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s