भूक : एक जागतिक सत्य

मित्र हो,

प्रेम……….मोह…………माया………ममता या साऱ्या पेक्षा खरं काय ?

भूक.

होय. भूक हेच खरं वास्तव आहे. पण काहीजण ढेकर देतात………..आणि लाखो जीव दोनवेळच्या अन्नासाठी तडफडत राहतात………….हे भयानक सत्य आपल्याला जाणवत नाही. रस्तोरस्ती आणि प्रत्येक देवळासमोर लाचारीने हात पसरणारे लाखो जीव पहात असूनही भुकेची दाहकता आपल्याला बोचत नाही. कारण आपण सारेच आपापल्या भाकरीच्या पाठीमागे धावणारे.  अगदी मीसुद्धा. त्यामुळेच मलासुद्धा कधी इतरांच्या भुकेची जाणीव झाली नव्हती. पण ” अक्षय पत्र ” या संस्थेनं आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी पोस्ट टाकायची होती म्हणून थोडी नेटवर चक्कर मारली आणि हे वास्तव हाती आलं.

मित्रहो या संस्थेला आपआपल्या परीनं मदत करणं आपलं कर्तव्य आहे. ते शक्य नसेल तर यातून प्रेरणा घेवून आपण आपल्या परिसरातल्या खऱ्या अर्थानं गरजवंत असणाऱ्या एका तरी जीवाला दोन घास पुरवले तरी पुरेसं आहे.
कारण मित्रहो आपण कितीही चांगलं चुंगलं खाल्लं तरी शेवटी हाती काय येणार आहे. त्यापेक्षा आपल्या घासातला घास भुकेलेल्या दिला तर……….तर खऱ्या अर्थानं आपण ईश्वराचे अंश आहोत हे सिद्ध होईल.

 

 

हे हि एक आरस्पानी सौंदर्य म्हणून नावारूपाला आला असतं
जर त्याला दोनवेळचं अन्न मिळालं असतं

 

 


 

दोन घास मिळत नाहीत
प्राणसुद्धा जात नाहीत
अशी तडफड नको देवा
आणखी काही मागत नाही

 

  

 

 

एक अन्नासाठी तडफडणारा
दुसरा अन्नाच्या दिशेने झेपावणारा

 

 

 

चारयावीना गेला जीव
कसायाच्या हाती देह

Advertisements

1 Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s