असं सुखाचं वर्ष यावं

मित्रहो,

दिवसभर खूप कंटाळलो आहे. सकाळी लवकर उठायचं. पुन्हा ऑफिसला जायचंय. रविवारी ऑडीट आहे. त्यामुळं हक्काची सुट्टीही बोंबलली. कसलं सेलिब्रेशन अन कसलं काय ? उद्या पेपरात तर्रर्र झालेल्यांचे आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी झपाटून गेलेल्यांचे एकेक किस्से वाचले कि मला प्रश्न पडतो – ” आयला. कसा वेळ मिळतो या लोकांना ? ”
पण त्यांच्या सुखाकड पाहून आपण जळत बिळत नाही काय. त्यांच सुख त्यांना लखलाभ. आपण धावत राहू भाकरीच्या पाठीमागे.”
आता तुम्ही भडकाल माझ्यावर. म्हणाल, ” च्यायला. हि काय यांना भंकसगिरी चालवलीय ? आम्ही काय हे असलं रडगाणं वाचायला याचा ब्लॉग वाचतो काय ? “जाऊदेत. मला सांगायचा होतं ते एवढंच मित्रहो कि मी खरच खूप कंटाळलो होतो.
खरंतर ३१ डिसेंबरला या वेळेला कुठल्यातरी बार मध्ये बसून मस्त हवेत तरंगायचं सोडून इथं बसून ब्लॉग लिहिणारा मी म्हणजे कोणी तरी खुळा असेल असंच तुम्हाला वाटत असेल. पण आत्ताच म्हणजे ९.३० ला ऑफिसातून आलोय. जेवलोय. आणि बसलोय लिहायला. काय लिहावं काही कळत नव्हतं.
” तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला सुख – समृद्धीचं,  आनंदच आणि भरभराटीच जावो. ” एवढी दोन वाक्य खरडूनही मी तुम्हाला तंग मारू शकलो असतो.
पण माझ्या ब्लॉगकडे नेहमीच खूप आशेने पहाणाऱ्या रसिक मित्रांचा खूप भ्रमनिरास झाला असता. म्हणून आत्ताच नवी कोरी कविता लिहिलीय तीच पोस्ट करतोय. याच माझ्या शुभकामना.!!!!!!!!!!!!

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s