ए देश इतना अमीर नही

हॉटेल मध्ये टीप देऊन स्वतःचा जहागिरीच प्रदर्शन करणाऱ्यांच मला नेहमीच खूप अप्रूप वाटतं. मी एक तर हॉटेल मध्ये फारसा कधी जात नाही आणि गेलो तरी कधी टीप देत नाही.

पण मी आज एका पार्टीला गेलो होतो. ड्रिंक्स ही घेतले होते. हे सारं लिहितो आहे ते ही एका तारेतच. तरी ही अधिकाधिक न चुकता लिहायचा प्रयत्न करतोय.

तर झालं काय. पार्टीत आम्ही डिंक्स घेतले. थोडी कमी पडली. म्हणून  आणखी एक कॉरटर मागवली. ६५ रुपयाच्या कॉर्टरचे स्पेशल सर्विस म्हणून त्याने ९० रुपये घेतले. मी १०० ची नोट दिली. इतर बिल दिला होतं. निघताना राहिलेले १० रुपये परत घ्यायचे होते. पण जाणून बुजून दुर्लक्ष केलं. इतर वेळी न चुकता राहिलेल्या बिलाची आठवण करणाऱ्या वेटरन या वेळी मात्र, ” तुमचे दहा रुपये तर झालं काय. पार्टीत आम्ही डिंक्स घेतले. थोडी कमी पडली. म्हणून  आणखी एक कॉरटर मागवली. ६५ रुपयाच्या कॉर्टरचे स्पेशल सर्विस म्हणून त्याने ९० रुपये घेतले. मी १०० ची नोट दिली. इतर बिल दिलं होतं. निघताना राहिलेले १० रुपये परत घ्यायचे होते. पण जाणून बुजून दुर्लक्ष केलं. इतर वेळी न चुकता राहिलेल्या बिलाची आठवण करणाऱ्या वेटरन या वेळी मात्र, ” तुमचे दहा रुपये राहिले आहेत ते घेऊन जा.” अशी आठवण काही केली नाही.

घरी आलोय. हे सारं आठवतंय. पुढल्या वेळी गेलो कि राहिलेले १० रुपये पुन्हा मागून घ्यायचे असं ठरवलंय. लाज वाटणार आहे मला. पण कुठलीही लाज बाळगायची नाही असं असं ठरवलंय.

कारण ज्याला त्याच्या कामाचा मोबदला मिळतो त्याच्यावर आणखी पैसे उधळण्या इतपत हा देश श्रीमंत नाही याची मला जाणीव आहे.

काही चुकतंय माझं ?

Advertisements

4 Comments

    • माफ करा हेरंबजी,
      पण चांगलं काम केलं कि टिप मिळते, काम वेळेत केलं कि लाच मिळते, काम अडून धरलं कि माणसं जेरीला येतात आणि पैसे देतात. टिप काय…….वजन काय……गांधीबाबा काय……..सारी एका आईचीच लेकरं आहेत.

  1. हो चुकतंय. टीप देण्याचा आणि देशाच्या श्रीमंती/गरिबीचा काहीही संबंध नाही. टीप दिली जाते ती कामाची पावती म्हणून.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s