चवल्या पावल्या

खूप दिवसातून लिहितोय आज. उस तोडून जायचा होता. त्यासाठी अनेकदा गावी जाव लागलं. खूप धावपळीत गेले दिवस.
त्या काळात गावी अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याचे लाख झाल्याचं ऐकलं. एका म्हाताऱ्याच्या कांद्याचे तर म्हणे सतरा लाख झाले. एवढा पैसा त्या बाबानं कधी पहिला नव्हता. सहाजिकच म्हणे त्यानं अचानक पाहिलेल्या पैशामुळे जीव गमावला.
पण हा सारा खेळ महिन्या दीड महिन्याचा. झालं. ऐंशी – नव्वदचा कांदा एकदम चार – सहा रुपयांवर आला. आणि कांदा………कांदा म्हणणारा शेतकरी एकदम हवालदिल झाला. कांद्यानं कधी कुणाला ह्सवल्याच ऐकिवात नाही. पण काही काळ का होईना शेतकरी राजा हसला…………पण आता तोच कांदा त्याला रडवतोय.
या साऱ्याला जबाबदार कोण ?

खचितच ………..
आमचा शासन………..
व्यापारी………..
दलाल………….
आणि आडते.

हि सारी मंडळी मोकळ्या हातानं बाजारात उभी रहातात आणि गडगंज संपत्ती कमावताना शेतकर्याच्या हातात मात्र चवल्या पावल्या ठेवतात. यांना आवर घालायलाच हवा. म्हणून हि कविता.

दुष्काळ, शेतकऱ्याच्या आत्महत्या या बद्दल नेहमी खूप लिहून येत वर्तमानपत्रात. शेतकरी संघटना आहेत. सहकारी संस्था आहेत. ग्रामीण भागातून  राज्यसभेवर आणि लोकसभेवर निवडून गेलेले पुढारी आहेत. सगळं सगळं आहे. पण आमच्या शेतकऱ्याची दुर्दशा मात्र थांबलेली नाही.

मी मुळात ग्रामीण भागातला. गावाकडच सारं काही खूप जवळून अनुभवलेला. विहिरीवर मोट हाकलेला. भर मध्यानीच्या उन्हात नांगर धरलेला. गाई गुरांच्या संगतीत आणि बैलांच्या गोठ्यात बालपण गेलेला.

शिकलो, सावरलो. शहरात आलो. शहराचाच एक भाग झालो. गावी अजूनही शेती आहे. पिकतं आहे. वडील घराच्या वर्षभराच्या रसदी पुरतं आमच्या शहरातल्या घरात आणून ठेवतात आणि उरलेलं शहरातल्या बाजारपेठेत आणून विकतात. पण आम्ही पिकल्यानंतर विकताना आणि वर्षाच्या अखेरीस  घरातलं धान्य संपतं तेव्हा शहरातल्या दुकानातून विकत घेताना लक्षात येत आपण जे कवडीमोलान विकतो तेच पुन्हा सोन्याचं मोलानं विकत घ्यावं लागतं आहे. असं का  ?

मी फार कमी शेतकरी शेतीच्या बळावर साधन झालेले पहिले आहेत. अन्यथा सर्वसाधारणपणे शेतकरी म्हणजे दरिद्रीच. असं का होत आहे ?

गरेजेपेक्षा कमी किवा गरजेपेक्षा अधिक पडणारा पावूस, भूजलाची खोलावत चाललेली पातळी. या नैसर्गिक गोष्टी याला काही प्रमाणात निश्चित  कारणीभूत आहेत. पण आता माझ्या लक्षात येत आहे. शेतकऱ्याच्या या दुर्दशेला खरे कारणीभूत आहोत आम्हीच .

आम्ही शहरात जे जे करतो शहरात त्या कश्या कश्याने पोट भरत नाही. पण शहरात पिकणाऱ्या सगळ्याच यंत्रनिर्मित गोष्टींचे भाव उद्पादक ठरवतात . आणि शेतकरी पिकवतो त्याचा भाव आम्ही ठरवतो. शहरातले मुठभर अडते, दलाल, व्यापारी .

खरंतर सोन्याने पोट भरत नाही पण तरीही जगाचं अर्थकारण सोन्यासारख्या धातुभोवती फिरतं आहे. हा अर्थकारणाचा आस जोपर्यंत बदलत नाही आणि  तो शेतकी उत्पादनाभोवती जोपर्यंत फिरणार तोपर्यंत शेतकरी कधीहि आत्मसन्मानाने जगू शकणार नाही .

आणि भारतासारख्या शेतीप्रधान देशाच्या अर्थ व्यवस्थेने तर नक्कीच शेतकी उत्पादनाभोवती रुंजी घालायला हवी.

आम्ही जेव्हा खूप महागाई झाली असं म्हणतो, भाज्या  तीस – तीस, चाळीस – चाळीस रुपये किलोने घेतो. मेथीची गड्डी दहा – बारा रुपयाला  घेतो  तेव्हा   आमच्या शेतकऱ्याच्या पदरात किलोमागे पाच- सात रुपये आणि मेथीच्या एका गड्डी मागे एक – दोन रुपयेही पडत नाही

एकूण परिस्थिती अशी आहे कि विहीर खणायची शेतकऱ्याने आणि पाणी प्यायचं व्यापाऱ्याने.

पण उद्या आम्हाला हे चित्र बदलायला हवं. शेतकऱ्याला बळ द्यायलाच हवं.

पण हे तुम्ही, मी, शहरातली व्यापाऱ्यांची लॉबी, आमचे पुढारी, करतील असं मला वाटत नाही.

त्यासाठी आमच्या शेतकऱ्यालाच कंबर कसावी लागणार आहे.

Advertisements

1 Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s