एका लग्नाची चित्तरकथा

आज आमच्या गावातल्या गृहस्थांच्या मुलीचं लग्न होतं.

पोरगी युएस रिटर्न. पोरगाही म्हणे असाच कुठला तरी रिटर्न.

पोरीच्या बापानं म्हणे १०० तोळे सोनं दिलेलं मुलीला. लग्न मंडपाच काम महिनाभर चाललेलं. त्याच्यासाठी ऐकिवात आलेला खर्च १ कोटीच्या आसपास.

आख्ख्या गावाला चूलबंद आवतनं……..दोन्ही वेळचं.

लग्नाला उपस्थित रहाणाऱ्या प्रत्येक बाईला म्हणे साडी दिली जाणार होती. गड्यांना मात्र धोतर पटका नाही.

लग्न पत्रिका तर प्रत्येक घरागनिक. तीसुद्धा साधीसुधी नाही. चांगली किमती. पत्रिकेत विलासरावांपासून ( माजी मुख्य मंत्री ) ते सुशील कुमार शिंद्यानपर्यंत साऱ्यांचा नामोल्लेख. प्रत्यक्षात आलं कुणीच नाही.

हे गृहस्थ नगर पालिकेत अग्निशामक दलात कामाला होते. एका सध्यासुध्या पदावर. पण यांच्याकडे गडगंज संपत्ती. आली कुठून माहित नाही. पूर्वी हातभट्टीची भट्टी चालवायचा म्हणे…….बक्कळ पैसा कमावला म्हणे दारू गळून.

अहो मध्ये एका बँकेन माझ्या बचत खात्याचा तपशील मागवलेला. त्यात दोन तीन ठिकाणी बड्या रक्कमांच्या ( म्हणजे १ लाखाच्या आसपासच्या ) नोंदी. त्या पहिल्या आणि बँकेन मला सवाल केला हे एवढे पैसे तुमच्या खात्यात आले कुठून ? मला स्पष्टीकरण द्यावंच लागलं पण पुरावेही द्यावे लागले.

पण आमच्या आयकर खात्याला मात्र असा झगमगाट पाहून या गृहस्थाकडं एवढी संपत्ती आली कुठून असा प्रश्न कसा पडत नाही ?

बरं हे गृहस्थ स्वतःला महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकीतले स्पर्धक समजतात.

लग्न लागलं. झगमगाट हो नुसता. आम्ही तर लांबन पाहूनच दिपून गेलो………….प्रत्यक्ष लग्नाला गेलेल्यांचे तर कोळ्सेच झाले असतील.

जेवायला पंचपक्वान………..ह्या……….!!!!!!!!!!!!

अहो पंच काय !!  पक्वानच पक्वान…….. हातापायाची बोटं पुरायची नाहीत मोजायला. दहा……..वीस नाहीत……….अहो चक्क चाळीस पक्वान.

चायनीज पासून………पार उसळीपर्यंत…………
पाणीपुरी पासून………..पार भेळी पर्यंत………..
बासुंदी पासून…………पार श्रीखंडा पर्यंत………….
आणि ……….
जिलेबी पासून………….पार बर्फी पर्यंत.

पण लग्न लागल्या नंतर तिथ अशी काही झुंबड उडाली म्हणता कि…………कित्येक बाया बापड्यांना अर्धा पोटीच परत यावं लागलं. आणीं घरी तर काय टोपलच पालथं घातलेलं होतं. भूकेपोटी तळमळत रात्र काढावी लागली बिच्यारयांना…………..आणि वर हो ती साडी का काही तरी मिळणार होती ती नाहीच मिळाली त्याच्याही डागण्या.

पैसा नाही कमी पडला……….नुसत्या मांडवात १ कोटी घालणाऱ्या माणसाला पैसा कसा कमी पडेल………….नियोजन कमी पडलं हो नियोजन.

मला या साऱ्याच कौतुक वाटलं म्हणून नाही लिहित हे सारं.

लग्न थाटामाटात व्हावं याला विरोध नाही माझा………पण हे सारं म्हणजे अतीच झालं हो.
आणि मी सांगतो हा सारा झगमगाट काही मुलाकडच्यांना लाजवायच म्हणून नाही काही………..मी माझ्या मुलीच्या लग्नात एवढा खर्च करू शकतो तर येत्या निवडणुकीत किती करू शकेन हे हायकमांडला कळवा म्हणून. ( हायकमांड म्हणजे गावपातळीवरचे…………दिल्लीचे नव्हे काही. )

हे सारं असं पाहिलं कि आपला रुबाब दाखवणाऱ्या लोकांची कीव करावीशी वाटते.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s