प्रियकर असा असावा

आपली प्रेयसी ‘ अशी असावी ‘ हे प्रत्येकाला खूप सहजपणे सांगता येतं.

आपली प्रेयसी, आपली सखी खूप सुंदर असावी असं जसं प्रत्येकाला वाटतं. तशीच ती खूप प्रेमळ आणि सुस्वभावी असावी असंही वाटतं. ती तुळशीवृंदावनातल्या तुळशी एवढी पवित्र आणि सोज्वळ असावी असाही आपला हेका असतो.

पण मी सुद्धा तुझा प्रत्येक शब्द झेलेन, तुझ्या सुखात सुख होईन आणि तुझ्या दुःखात सुद्धा तुला सुखाचाच स्पर्श देईन असं म्हणणारा प्रियकर विरळाच. पण आता प्रेमाच्या व्याख्याच बदलत चालल्यात. ती नजरेत भरण्यासारखी असेल तर तो तिच्यावर प्रेम करील………….आणि ती …………..तो तिचा प्रत्येक शब्द तळहातावर झेलणार असेल तर त्याच्यावर प्रेम करणार.

पण तुझ्याकडून मला खरंच काही नको रे फक्त भरभरून प्रेम दे मला असं ती म्हणत नाही…………आणि तो……….तोही असं म्हणत नाही कि मला तुझ्याकडून काही नको………तुझा स्पर्श नको…………तुझा सहवास नको……….फक्त हवेत तुझे डोळे त्यात खोल बुडून जाण्यासाठी………हवं तूझं फक्त तूझं हसू………जगण्याच्या प्रत्येक श्वासाला सोबत करण्यासाठी……….

पण ती असते बऱ्याचदा तयार………. त्याच्यासाठी राधा होऊन पायघड्या घालायला……………..मीरा होऊन विषाचा प्याला रिचवायला…………तिची अपेक्षा असते ती एवढीच कि त्यानाही कृष्ण होऊन भान हरपून त्याच्यावर जीवापाड प्रेम करावं.

पण तिच्याकडून एवढ्या अपेक्षा करताना आपण कसे आहोत किंवा तिच्याही तिच्या मनातल्या सख्याविषयी, तिच्या जिवलगाविषयी काही अपेक्षा असतील असा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. ती दिसते…….. सुंदर असते………. म्हणून आपण तिच्या प्रेमात पडतो……..…खोल खोल बुडत जातो. तिला आपल्याविषयी काय वाटतं याचा थोडाही विचार आपण करत नाही.

या कवितेतला प्रियकर मात्र ही सारी जाणीव बाळगून आहे. म्हणून तो जेव्हा त्याच्या सखी कडून ‘ प्रीतबावरी मीरा ‘ होण्याची अपेक्षा करतो तेव्हा स्वतः ही ‘ कृष्ण मुरारी ‘ होण्याचं वचन देतो. तो जेव्हा तिला ‘ राधा ‘ व्हायला सांगतो तेव्हा स्वतः ही  राधेच्या मनातला ‘ सावळा कृष्ण ‘ होण्याची तयारी ठेवतो. इतकंच नव्हे तर तिच्या आयुष्यातला दुखाच्या प्याल्यातला सुखाचा थेंब होण्याचं आश्वासन देतो.

मित्रहो खरंच इतकं भान हरपून प्रेम केलं तर ती नक्कीच पंख पसरून तुमच्या आयुष्यात येईल. तुमच्या डोक्यावरचं ऊन झेलताना ती सुखाची सावली होईल.

कृष्ण मुरारी होईन मी

तू प्रीतबावरी मीरा हो

महादेवाच्या माथ्यावरची

गंगेची तू धारा हो

 

कृष्ण सावळा होईन मी

तू अल्लड अवखळ राधा हो

मिठीत शिरता सांज सकाळी

फुलता फुलता मुग्धा हो

 

चक्रपाणी होईन मी तू

गीतेमधली वाणी हो

पहाटलेल्या स्वप्नामधली

तू एकटी राणी हो

 

मीरा हो तू, राधा हो तू

हो गीतेची वाणी

तुझ्याचसाठी भोगीन मी

पुन्हा मानवी योनी

 

तुझ्याचसाठी पुन्हा एकदा

जन्म येथला घेईन मी

तुझ्या दुखाच्या प्यालामधला

थेंब सुखाचा होईन मी.

Advertisements

9 Comments

      • शुभांगी, प्रतिक्रियेबद्दल. खूप खूप आभारी आहे. रागावणार नसाल तर एक गोष्ट सांगिन. आजकाल राधेसारखी राधा आणि कृष्णासारखा कृष्ण मिळणं फार फार दुरापास्त झालाय.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s