आधी शेतकऱ्याला जगवा

ऑगस्ट मध्यें वडील गेले आणि गावच्या शेतीची जबाबदारी मी माझ्या शिरावर घेतली. माझं ऑफिस सांभाळून. मग सहाजिकच गेली पाच सहा महिने गावाकडे धावपळ चालू आहे. तिथल्या अडचणी जवळून पहातो आहे.

कुठं पाणी नाही………….

कुठं पाणी आहे, तर वीजपंपांना वीज नाही.

वीज असली तर तिची निराळीच तऱ्हा.

………..कुठे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा

………..कुठे संध्याकाळी सहा ते रात्री दोन

…………तर कुठे रात्री अकरा ते सकाळी सहा.

बरं ह्या विजेचेही छप्पन नखरे……….पाच दहा मिनिटाला झटका हाणणार………….सारखीच आपली नवी नवरी  असल्यासारखी रुसणार………सासरी येणाऱ्या नव्या नवरी सारखी……आली आली काय………आणि गेली गेली काय…………दिवसा तर बाई अजिबात नीट नांदणार नाही………..तिच्या मग मग पळून शेतकऱ्याला जीव जातोय. पण हि बाई काही त्याला थारा देणार नाही. …………..पण रातीची मात्र शेतकऱ्याला चांगलीच जवळ करणार. अजिबात रुसणार नाही.

पण रातीची तरी ती असणार म्हंजी कशी ??? शेतकऱ्यालाच्या पायाखाली नाही काही………….ती असणार फकस्त पंप चालवायला……….शेतकऱ्याच्या पायाखाली इचू आलाय का काटा आलाय कोण बसलंय पहायला.

लाईटीचं हे असं दिसाच नखर बघून शेतकरी आपला रातीलाच भरणं करतोय. मंग इचू काट्याच भ्या नाही धरत……..का त्याला गारव्यातल हीवही नाही भरत.

रविवारी मी गावी गेलो होतो. मुक्कामी. लाईटीची वेळ होती सकाळी ध ते संध्याकाळी सहा. पण दिवसभर तिनं लईच झटके हाणले. दुपारी चारला गेली ती गेलीच. पुन्हा यायचं नाव नाही.

चुलत भाऊ म्हणाला, ” आता येईल राती अकराला. रातच्यालाच भरणं करू सारं.”

आमचा गडीही होता सोबत. मी म्हणालो, ” मीही येतो रात्री अकरा वाजता.”

गडी म्हणाला, ” तुम्ही काय करणार येऊन ? ”

चुलत भाऊ म्हणाला, ” येउदे कि. तुला काय अडचण हाय ? हुईन तेवढाच गप्पा हाणायला. ”

रात्री अकरा वाजता मला उठव असं भावाला सांगून मी झोपलो.

रात्री जाग आली. पाहिलं तर लाईट आली होती. घड्याळ बघितलं तर तीन वाजलेले. भाऊ कधीच रानात गेला होता. मी दार उघडून बाहेर आलो. चांगलीच थंडी पडली होती. मी जर्किन अंगावर चढवल. मोबाईल टोर्चच्या उजेडात रस्ता चाचपडत रानात गेलो तर चुलत भाऊ आणि आमचा गडी दोघंही रानात.

आमचा गडी अधून मधून कचा कचा चिखल तुडवत बारं द्यायला जायचा. पाटाच्या गार पाण्यातून सपा सपा पाय वाजवत माघारी यायचा. मोटरीच्या डेंबावर हातपाय खंगाळायचा आणि गप्पा मारत पुन्हा आमच्या जवळ येऊन उभा रहायचा.

आम्ही हितं शिटीत मऊ गादीवर खालून वरून अंगावर चांगल्या दोन दोन रजया किंवा चादरी घेऊन, घराला पार कडी कोयंड लाऊन झोपतो. मुख्यमंत्र्यांच्या आन कृषीमंत्र्यांच्या घरी तर काय एसीच असणार !!!

बाबा ऐन थंडीत एकडाव रातच्याला शेतकऱ्याच्या बरुबर भरण्यावर जावून बघ.

मला म्हणायचं ते एवढंच, ” नाही आमच्या सरकारला गुजरातच्या मोदी सरकारसारखी शेतकऱ्याला प्राधान्यानं अहोरात्र वीज द्यायला जमणार नाही. पण दाम दुप्पटीन पैसे कमावणाऱ्या उद्योगांना जर रात्रीची आणि ग्रामीण  भागाला जर दिवसाची अखंड वीज दिली तर सरकारचं काय दुखणार आहे ?????? ”

” आहो, आम्ही इथ पाच नाही दहा रुपयांना विकत घेऊन खाऊ दे. पण ते तिथ पिकतंय म्हणूनच ना ! ”

तेव्हा माझी मायबाप सरकारला विनंती आहे ती एवढीच, ” कि शहरं जगायला हवीत असं वाटत असेल तर आधी आपल्या शेतकऱ्याला जगवा. त्याची अनुदान दोन पैशांनी कमी केलीत तरी हरकत नाही पण त्याला हवी तेवढी वीज द्या.”

Advertisements

1 Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s