आलाच देव धावून….

अजून मजा येत नाही
हे खरं आहे कि नाही !!!

दिवस कसे भर भर जातात नाही !!!
आम्ही आपले मोजतच असतो……..
एक वर्ष गेलं ……..
दुसरं गेलं…….
तिसरं गेलं…….
काऊनट डून सुरु झालं………
आणि आला कि बघता बघता वर्ल्डकप.

शुभारंभाची आपली आणि बांगलादेशची म्याच जरा बघण्याजोगी झाली. पहिल्या आठ दहा षटकांपर्यंत धाकधूकच वाटत होती. पण ३६० धावा होत्या सोबतीला….म्हणून जिंकली.

अर्थात आपल्या २५० रना असत्या तर आपण ती म्याच नक्कीच हरलो असतो असा मात्र कुणी म्हणू नये हां ! कारण आपल्या २५० रना झाल्या असत्या तर आपण बांगलादेशाला २०० रनातही गुंडाळल असतं.

कुणी म्हणायचं, ” च्यायला, हा फारच भारत धार्जिणा दिसतोय बरं का !!!!”

म्हणालं तर म्हणालं. मला नाही त्याची फिकीर, माणसानं काय फक्त पाक धर्जीनच असावं काय ???

असो.

सलामी छान झाली. पण त्यानंतर फारच रटाळ खेळ पहायला मिळाला. आपण वर्ल्डकप पाहतोय की एखाद्या गल्लीतले सामने अशी शंका यावी इतपत. अहो साठ आणि सत्तर रनात ऑल आउट म्हणजे काय!!

कुणी म्हणेल, ” महाराज, १९८३ ची आठवण विसरलात काय ?? ५ बाद सतरा. ”

” विसरेन कसा ? चांगलं लक्षात आहे. पण आलाच ना शेवटी ‘ देव ‘ धावून.”

पण कालची नेदरल्यांड – इंग्लंड म्याच मात्र झकास झाली. याच इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला परवा परवा माती चारली होती यावर विश्वासच बसला नाही. इंग्लंड हरते काय असं वाटत होतं.

आजची म्याचही तशी सो सोच झाली. पण केनियाना दोन चार सिक्स हाणून घेतले म्हणून जरा बरं वाटलं.
त्यामुळंच म्हणालो, ” अजून मजा येत नाही.”

पहात राहू ………मजा येत जाईल………..मीही अधून मधून लिहित राहील. आवडलं तर नक्की कळवा.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s