याला म्हणतात नशीब

कधी काय होईल सांगता येत नाही.

कधी नव्हे ते कांद्याचे भाव वाढले आणि शेकड्यात खेळणारा शेतकरी एकदम लाखात लोळायला लागला.
तेव्हा अनेकांच्या तोंडी, ” लई बुवा नशीब गड्याचं!!!!” असे उद्गार ऐकले.

ह्याच कांद्याचे भाव पार साठ आठ रुपयावर आले आणि जेव्हा भर बाजारात आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली तेव्हा पुन्हा अनेकांच्या तोडी, ” नशीबच खोटं बुवा गड्याच. ” असेही उद्गार ऐकायला मिळाले.

मागे मी लिहिलेल्या

जे हसतील…..

या लेखावर मला मनोहर या एका मित्राची प्रतिक्रिया आली होती. ती अशी –

” सातत्य म्हणजे काय रे भाऊ ?”

उगाच कुणालातरी सारखंच फटकारायचं, हे मला जमत नाही. आणि वरील प्रतिक्रियेवर काय उत्तर द्यावं हे न सुचल्यानं मी मुग गिळून गप्पं बसलो. तेव्हा कुठे ” मुग गिळून गप्पं बसणे ” या म्हणीचा अर्थ मला कळला.

पण मी शांत बसलो नव्हतो. संधीची वाट पहात. या प्रतिक्रियेला उत्तर देण्याची संधी मला आज मिळाली.

ती संधी आज मिळाली.

भारत – इंग्लंड म्याच.

आज बहुधा सुखाचा दिवस होता.

सचिनची सेन्चुरी.

भारताचा ३३८ धावांचा डोंगर.

म्हणालं इंडिया जिंकणार.

पण कसलं काय नशीबच भिकार आमचं.

Strauss नं धरलीना लावून. इंग्लंड २ बाद २८०. सगळ्या आशा मावळल्या होत्या.

धोनी खूप यशस्वी कर्णधार असला तरी काही वेळा तो खूप नशीबवान ( लकी ) आहे असंही वाटतं.
पहा ना !!!!!!!

इंडिया हारणार म्हणता म्हणता झहीरन दोन आणि भज्जीन एक विकेट घेतली. आणि झालं ” जितेगा भाई जितेगा, इंडियाही जेतेगा !!! ” चा घोष सुरु झाला.

२० बॉल ३८ रन.

म्हणलं आतातर शंभर टक्के  जिंकणार.

पण कसलं काय ? शेवटी टाय.

आता सांगाल मनोहरजी, ” सातत्य कशाला म्हणता येईल ते ? ”

अहो जिथं………….अखंड………..अविरत……….तिन्ही प्रहर……….चालणाऱ्या आमच्या श्वासाचं सातत्य आम्हाला राखता येत नाही. तिथ आपण सातत्याची भाषा करावी कशाला. खेळात हार – जीत होत असते.

आपण फक्त आपले प्रयत्न करावेत………….. बस्सं!!!!!

1 Comment

  1. खरतर हातघाई या परिस्थितीला कारणीभूत ठरली आणि शेवटी प्राणांवर आले ते बोटांवर निभावले.

Leave a comment