निष्पाप विजय

इंग्लंडला झालंय काय ?

हॉलंडबरोबर कसेबसे जिंकले.

भारताबरोबर पहाडा एवढ्या धावांच्या डोंगरासमोर म्याच बरोबरीत सोडवली आणि हातामधून निसटलेली अब्रू परत मिळवली.

आणि आज आयर्लंडकडून पराभूत. तेही ३३८ धावांचा डोंगर रचून. इंग्लंडने गमावल्या आठ विकेट……आणि आयर्लंडनं फक्त सात. खरंतर पाचच म्हणायला हव्यात. कारण इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसं काढणारा ‘ केविन ओ ब्रायन ‘ अखेरीस धावबाद झाला.

वाघाच्या जबड्यात मन अडकलेल्या शेळीसारखी अवस्था झाली होती इंग्लंडची………..हतबल……..हताश.

सध्या पोंटिंगची वाचा बंद झालीय.

आता तो ‘ तहयात ‘  ‘ लिंबू – टिंबू ‘ हा शब्द उच्चारणार नाही.

मागे केनियानं आणि आता आयर्लंडनं –

” कुणालाही कमी लेखू नका ”

हा धडाच घालून दिलाय.

परवा ऑस्ट्रेलियानं हॉलंड बरोबरच्या सामन्यात सुरुवातीच्या षटकात खूप कमी गतीनं धावा काढल्या म्हणून काहींना त्यात काळंबेरं दिसायला लागलं.

भारताविरुद्धची म्याच इंग्लंडनं बरोबरीत सोडवली म्हणून त्यातही काहींना फिक्सिंचा वास यायला लागलाय.

आता इंग्लंडचा आयर्लंड विरुद्धचा प्रभाव तर फिक्सिंगच्या या शंकेला अधिकच बळकटी देईल.

पण आयर्लंडच्या या विजयाला जर कुणी फिक्सिंगचं गालबोट लावलं तर तो आयर्लंडच्या निष्पाप विजयाचा घोर अपमान ठरेल. कारण इंग्लंडकडून सामन्याच्या अगदी शेवटी शेवटी सुटलेले एकदोन झेल सोडले तर आयर्लंडच्या फलंदाजांनी इंग्लंडला मुळी विजयाची संधीच कुठे दिली नाही.

ब्रेव्हो…………ब्रायन !!!!!

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s