एका रात्रीत मोठा झालेला माणूस

कुणाचं नशीब कधी बदलेल सांगता येत नाही.

चार आठण्याची दानत नसणारा माणूस लॉटरी लागते आणि एका रात्रीत कोट्याधीश होतो.
आणि गडगंज संपत्ती असणारा माणूस एका रात्रीत रस्त्यावर येतो.

पण हे असं एका रात्रीत कधी घडत नाही. त्या असं घडण्याच्या मागे कुठलीतरी पुण्याई असते.

आणि गडगंज संपत्तीच्या पसाऱ्यातून रस्त्यावर येणारा माणूस त्याच्याच कुठल्यातरी पाशवी कर्मांची फळं भोगत असतो.

हे सारं लिहिण्याचं कारण असं कि मी मुलांचा अभ्यास घेत बसलो होतो. मुलांचा म्हणजे माझ्या जयेशचा आणि माझ्या बहिण्याच्या दिरांचा मुलगा आप्पाचा. हा आप्पा अभ्यासात तसा कच्चाच. बसल्या बसल्या मी सहज परवा लिहिलेला –

निष्पाप विजय

हा लेख माझ्या मोबाईलवर ओपन केला. मोबाईलवरही साईट छान दिसत होती. ती मुलांना दाखवावी म्हणून मी मोबाईल त्यांच्या समोर धरला. पहाता पहाता मुलांनी संपूर्ण लेखच वाचून काढला आणि या लेखाच्या खाली –

” ब्रेव्हो………..ब्रायन ” या मी ब्रायनला दिलेल्या शाब्बासकी पर्यंत मुलं पोहोचली.

आणि अभ्यासात कच्चा असलेल्या आणि कुठलंही अवांतर ज्ञान नसलेल्या आप्पासह माझा मुलगा मला म्हणाला, ” ब्रेव्हो ब्रायन नाही बाबा…………..केविन ओ बयान ”

मी मुलांना म्हणालो, ” कालपर्यंत हा केविन कोण आणि कुठला हे माहिती तरी होतं का तुम्हाला ? ”

” नव्हतच माहित. आहो बाबा, आमचंच काय, काळ शाळेत गेलो तर प्रत्येक मुलगा एकंच विचारायचा, काय खेळलाय रे तो ब्रायन काल, बघितलाय !!!!!”

प्रत्येक शाळकरी मुलानंही नाव घ्यावं एवढा ब्रायन एका रात्रीत मोठा झालाय.

एका रात्रीत माणूस किती मोठा होतो याचं माझ्या अनुभवातलं हे सर्वात ज्वलंत उदाहरण.

त्याच्या पुढल्या कारकिर्दीला आम्हा भारतीयांच्या मनःपूर्वक शुभेछा.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s