मणभर गवऱ्या….चारमण सरपण

काही वर्षापूर्वी मला एक पुरस्कार मिळाला होता. त्याच वेळी उद्योगपती श्री. सुभाष चुत्तर यांनाही पुरस्कार देण्यात आला होता. आणि त्यांची गाथा ऐकून मी भारावून गेलो होतो. सहाजिकच त्यांच्यावर मी ‘ माणसातली माणुसकी ‘ हा लेख लिहिला होता. आणि दैनिक सकाळ मधून तो प्रकाशितही झाला होता.

‘ सुभाष चुत्तर ‘ हे छोटे कारखानदार. चाळीस पन्नास कामगारांची त्यांची कंपनी. आणि तिथले सर्व कामगार मतीमंद.

होय मतीमंद !!!

मशीनवर काम करणाऱ्या कामगारांपासून ते संगणाकावर काम करणारयापर्यंत सगळेच मतीमंद. पण सगळेच पगारी नोकर. फुकटातले नाहीत. सुभाष चुत्तर त्यांना नुसतेच पगार देत नाहीत तर, त्यांनी त्या सगळ्यांना बचतीची सवय लावलीय आणि अनेकांच्या बचत खात्यावर लाखभराची रक्कम आहे.

स्वार्थ कुणाला नसतो. प्रत्यक्ष परमेश्वरानंही वेळोवेळी स्वतःचा स्वार्थ साधलाय. तिथ माणसाची काय कथा ? पण काही माणसं अशी असतात ज्यांना स्वतः बरोबरच समाजाच्या अस्तित्वाचीही जाणीव असते.

अशी माणसं असतात म्हणून जग चालतंय.

हे सारं आठवायला एका कारण झालं.

काल एक मेल आली होती.

एका जाहीर कार्यक्रमात उद्योगपती ‘ रतन टाटांना ‘ एक प्रश्न विचारला –

” तुम्हीसुद्धा अंबानींन सारखेच फक्त पैसा कमावण्याचाच विचार का नाही करत.”

त्यावर रतनजींनी दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. ते म्हणाले ” मी कारखानदार आहे आणि ते उद्योगपती ( बिझनेसमन ) आहेत. ”

त्या मेलमध्ये रतनजींच्या अनेक सामाजिक कामांचा वेध घेण्यात आला होता.

त्यांनी सरू केलेली अनेक हॉस्पिटल्स, ते त्यांच्या कामगारांची घेत असलेली काळजी, एक ना अनेक गोष्टी. त्यांचं सामाजिक काम खूप मोठ्ठ आहे.

पण मी हे सारं लिहिलं ते त्यांच्या –

” मी कारखानदार आहे आणि ते उद्योगपती ( बिझनेसमन )आहेत. ”

या उत्तरानं भारून गेलो म्हणून.

त्यावर मी साऱ्यांना लिहिलेली  कॉमेंट  इथं देतो मी लिहिलं होतं –

” survial does not means kill others ”

आणि

” if you can’t help to survive others atleast do not kil them !!!”

२००० कोटींहून अधिक मोठा घोटाळा करणारा ‘ राजा ‘, राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये १०० कोटींच्यावर घोटाळा करणारा ‘ कलमाडी ‘, बांधकाम व्यावसायिकांशी हातमिळवणी करून जागांचे भाव आकाशाला नेऊन भिडवणारे आणि सामान्य माणसाला बेघर करू पहाणारे ‘ पवार ‘ , ‘ आदर्श ‘ घोटाळ्यात अडकलेले मुख्यमंत्री ‘ चव्हाण ‘ आणि तमाम शासकीय अधिकारी. ही सारी मंडळी कधी बोध घेणार यातून ?

” आरे, बाबांनो कमवून कमवून किती कमावणार आणि नेणार कुठे ? जाताना लागतं काय आपल्याला मणभर गवऱ्या……………चारमण सरपण. बस्स !!!! अंतयात्रेच्या मागे आलेला लाखोंचा लोंढा ही त्यांच्या अंगाला सरणाची धग लागू लागली कि मागे फिरतो आणि आल्या पावली परत जातो मग कशाला एवढा आटापिटा करता. थोडा बोध घ्या आणि जनकल्याणाचा पहा.”

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s