काय म्हणायचं याला ?

काय म्हणायचं याला ?

नशीब ……….

प्रारब्ध………..

दैव………… Tsunami

कर्माची फळं……….

काय असतं हे नेमकं ?

अंड्यातून पिल्लू बाहेर पडतानाच त्यावर कुणाचा तरी पाय पडावा आणि जन्मण्याच्या आशेबरोबरच मृत्यू दिसावा………..

उंच डोंगरावरची शर्यत जिंकली म्हणता म्हणताच कडेलोट व्हावा……….आधार हाती येतानाच तोल

जावा…….

Japan Earthquake 15.jpg

याला म्हणायचं तरी काय ?

नाही लक्षात येत न मी कशा विषयी बोलतोय ते?

होय ! जपान विषयी……….जपान विषयीच बोलतोय मी.

केवढासा तो देश !!! Japan Earthquake 4.jpg

दुसऱ्या महायुद्धातल्या ‘ हिरोशिमा ‘ आणि ‘ नागासाकी ‘ या शहरांवरी ल अमेरिकेच्या अणुबॉम्बच्या  हल्ल्यान पार खचून गेला. आजही त्या शापित हल्ल्याची फळं भोगणारी पिढी तिथे जन्म घेतेय.Japan Earthquake 12.jpg

पण त्यातून जपान सावरलं. एक अघोषित महासत्ता म्हणून नावारूपाला आलं. कुणाच्या अध्यात नाही ……..कुणाच्या मध्यात नाही. कुठल्याही क्षणी फक्त प्रगतीची आणि नाविन्याची स्वप्नं पहाणार जपान. अगदी माझ्या कंपनीतली कितीतरी स्वयंचलित यंत्र ( CNC ) जपानमधून आयात केलेली . जपानी मालाची निर्मितीही कशी तर………….विश्वास ठेवावी अशी .

पण आजचा जपानमधला भूकंप आणि स्तुनामी………पुन्हा एक आघात. पण मला विश्वास आहे जपान यातूनही सावरेल.

 

पण तूर्तास तरी मी –Tsunami - Japan

‘ ये मलिक तेरे बंदे हम……..!!!!!!!’

याशिवाय अधिक काहीच म्हणू शकत नाही.

असं असलं तरी मनात येताहेत ओळी  –

‘ कणखर कणा, ताठ मान,
जपान देश, खरंच म्हण.’

मी जपान पाहिलेला नाही. जपानला कधी जाईन हे माहित नाही पण या ओळी म्हणजे  नुसताच ‘ यमक ‘ जुळवायचा प्रयत्न असं म्हणू  कुणी म्हणू नये.

 

Advertisements

1 Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s