काहीतरी चुकतंय

चुकत कुणाचं नाही ???

पण नकळत होते ती चूक.

जाणून बुजून केल्या जाणाऱ्या कृतीला चूक नाही म्हणता येत.

खूप खूप वर्षापूर्वी एक प्रयोग केला गेला होता.

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच व्हिटोरीनं डावाच्या गोलंदाजीची सुरवात फिरकी गोलंदाजांनी केली होती. तेव्हा ते विचित्रच वाटलं होतं. खुद्द व्हिटोरीनंही पुन्हा तसा प्रयोग केला नाही.

पण परवा आमच्या धोनीनं त्या प्रयोगाची अंमलबजावणी केली.

क्रिकेटची ही जागतिक रणधुमाळी सुरु होण्यापूर्वी भारत हा विश्वकप जिंकणार या बाबत प्रचंड विश्वास वाटत होता.

पण उपांत्य फेरीपर्यंत पोहचतानाच आमची अशी काही दमछाक झालीय कि जग्गजेते होणं तर सोडाच पण आम्ही अंतिम सामन्यापर्यंत पोहचू एवढाही विश्वास राहिलेला नाही.

धोनीची कुठलीच गोष्ट विश्वासपूर्ण वाटत नाही.

अगदी पहिल्याच सामन्यात श्रीसंतला चोप मिळाला म्हणून त्याला त्या चार षटकानंतर पुन्हा चेंडू न देणं आणि पुढच्या कुठल्याही सामन्यासाठी त्याचा विचार न करणं…………

अश्विन सारख्या गुणी गोलंदाजाला सतत संघाबाहेर ठेवणं…………..आणि संघात घेतल्यानंतर त्याच्याशी असा खेळ करणं….सगळंच चुकतंय.

होय !!! धोनीनं अश्विनशी खेळच केला होता असंच मला वाटतंय.

मी प्रवासात होतो. रेडिओवर सामन्याचं समालोचन ऐकत होतो. भारतानं टाकलेल्या तेरा षटकांमध्ये अश्विनची सात षटकं होती हे ऐकून मी काहीतरी चुकीचं ऐकतोय असं मला वाटलं. पण नाही मी ऐकत होतो ते खरं होतं.

त्या पॉवरप्लेच्या षटकात अश्विनची गोलंदाजी चोपली गेली असती तर ???

झालं, पुन्हा अश्विन संघाबाहेर.

पण अश्विनही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. त्यांना पहिल्या सहा फक्त १८ धावा दिल्या. एक बळीही मिळवला. त्याचं सातवं षटक थोडं महागड ठरलं. पण एकूणच त्यानं सुरेख गोलंदाजी. आता धोनीला जर आपला प्रयोग यशस्वी झाला असं वाटत असेल तर अवघड आहे.

धोनी पुन्हा असा प्रयोग करू पाहिलं तर आमच्या नशिबी पराभवापेक्षा अधिक काही पडणार नाही.
पराभवाचं दुख नाही. पण सचिन ज्या उमेदीनं किल्ला लढवतोय. सेहवाग त्याला ज्या रीतींन साथ देतोय. त्या साऱ्याचा काही उपयोग होणार नाही. पराभवाशिवाय दुसरं काही हाती येणार नाही. शेवटी एका पायावर तुम्ही किती वेळ चालू शकणार ???

आणि पराभवाचं शल्य सर्वात अधिक बोचेल ते, प्रत्येक सामन्यात हा वर्ल्डकप जिंकायचाच या उमेदीनं मैदानात उतरलेल्या सचिनला.

आज युवराजचं, ” कांगारूंचीही शिकार करू .” असं विधान वाचलं.

दोन चार सामन्यात चांगला खेळ झाला म्हणून युवराजच्या अंगावर मांस चढलय.सचिन वर्षानु वर्ष चांगला खेळतोय पण त्यानं असलं कुठलंही विधान केल्याचं ऐकिवात नाही.

विधानं करणं खूप सोपं असतं. आणि जिंकण्यासाठीच खेळणं खूप अवघड.

अजूनही वेळ गेलेली नाही. हेवे दावे सोडून जिद्दीनं खेळा. नक्की जग्गजेते ठराल.

Advertisements

1 Comment

  1. व्हेटोरीच्या आधी मार्टीन क्रोने दीपक पटेल या स्पिनरच्या हातात चेंडू सोपवून पाहिलं षटक त्याला टाकायला दिलं होतं. ही व्हेटोरीच्याही खूप पूर्वीची गोष्ट आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s