हिजड्यांच शस्त्र

( हिजड्यांना मी माणूसच समजतो. किंवा माझ्या समजण्या न समजण्यान काही फरक पडणार नाही. ती माणसच आहेत. तुमच्या माझ्या सारखी……….हाडा – मासाची………. भावना………. वेदना……… दुखं………अश्रू असणारी माणसं. पण ही मंडळीच स्वतःला माणूस म्हणून वागणूक देऊ इच्छित नाहीत. पोटाची खळगी  भरण्यासाठी काही केलं तरी माणसात येऊ इच्छित नाहीत. टाळ्या वाजवत स्वतःचा वेगळेपण जपण्यातच त्यांना मोठेपण वाटतंय. पण हे थांबवायला हवं. एक तृतीयपंथी नगरसेवक झाला म्हणून परिस्थिती बदलत नाही. तो संपूर्ण वर्ग बदलायला हवा. माणसात यायला हवा. आणायला हवा. )

मुलांची परीक्षा संपली. बायको म्हणाली, ” आपण शिर्डीला जाऊन येऊ.”

तसा हा बेत महिन्यापूर्वीच ठरलेला. शुक्रवारी पेपर संपला. आणि शनिवारी आम्ही गावी गेलो. तिथ शेतावर मुक्काम करून रविवारी सकाळी सकाळी शिर्डीकड निघालो.

मी खूप दिवसांनी शिर्डीला निघालो होतो. दिवसांनी कसला……..कितीतरी वर्षांनी. तिथ पोहचलो तर सारं काही बदललेलं. पार्किंगचा बोर्ड दिसला. गाडी लावायला गेलो. त्यानं सांगितलं पार्किंगचे चाळीस रुपये. काही इलाज नव्हता.

आलो देवाच्याच दारी
कसा जाऊ मी माघारी

पार्किंगवाल्याचा एक पोऱ्या आम्हाला देवळापर्यंत सोडवायला म्हणून निघाला. मीही आपला त्याच्या गळ्यात हात टाकून निघालो. म्हणाल,
” काय रे लेका, हि काय पद्धत झाली काय ? पार्किंगचे चाळीस रुपये असतात काय कुठे ?”
तो काही न बोलता नुसता हसला.
” पार्किंग देवस्थानाच का प्रायव्हेट रे ?”
” प्रायव्हेटच हाय साहेब.”
” तरीच देवाच्या नावानं चांगलंच लुटताय तुम्ही.”
” पण देवस्थानाच पार्किंग नाही का रे ? “
” होतं ना. पण आता बंद केलंय.”

मनात आलं इथं सगळेच एकमेकांना सामील.

पोरानं आम्हाला एका पूजेच्या साहित्याच्या दुकासमोर नेलं. इथं चपला, बुट काढून ठेवा. आम्ही  आठ – नऊ जणं. त्यानं एक पोतंच धरलं समोर.

साईबाबांच्या चरणी अर्पण करायचा म्हणून आम्ही एक नारळ, खडीसाखरेची एक आणि लाह्यांची एक अशा दोन पुड्या घेतल्या. रुपये झाले वीस.

दुकानदार म्हणाला, ” साहेब ५१ रुपयांचं ताट घ्या ना पूजेचं.”

” कशाला, अरे देवाला काय लागतं यातलं ? आम्ही त्याच्यावरच्या श्रध्येपोटी इथवर आलोय हेच पुरेसं आहे त्याला.”

दुकानदाराचा चेहरा अगदीच पडला.

प्रसाद घेवून आम्ही दर्शनाच्या रांगेकडे निघालो. हि इ इ इ इ इ……… भलीमोठी रांग. आम्ही रांगेत उभे राहिलोत. तुसा तुसानं  पुढे सरकू लागलोत. दीड एक तासानंतर देवाच्या अगदी जवळ पोहचलोत.

आणि ………..

मागून सटा सटा टाळ्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. अगदी टिपिकल टाळ्या. वळून पाहिलं तर तृतीय पंथीयांचा एक आठ दहा जणांचा घोळका धावत पळत रांगेतून सगळ्यांना मागे टाकून पुढे येत होता. त्यातले काही जण एखाद्या घरंदाज बाईलाही मागे सरतील एवढे देखणे. त्यातला एकजण सतरा आठराचा. बाहेर कुणीही त्याच्या सहज प्रेमात पडावा असा.

टाळ्या वाजवत वाजवत तो घोळका आमच्या जवळ जवळ येऊ लागला. इतका वेळ रांगेत उभा होतो. जरा कुणी पुढं जायचा प्रयत्न केला तर त्याला मागे खेचणारे खूपजण पहिले होते. पण यांना आडवण्याची हिम्मत कुणीच दाखवेना. मी ठरवलं आपण यांना आडवायचं.

बायकोनं माझ्या मनातला हेतू ओळखला असावा. तिनं मला आधीच तंबी दिली, ” तुम्ही गप्पा बसा हं.”

” गप्पा काय बसा ? हि काय पद्धत झाली ? सगळे साले पुचाट.”

” आहो, मी पाया पडते तुमच्या. त्यांचा शाप फार वाईट असतो. उगाच तमाशा करून घेऊ नका.”

सोबत मुलं, आई, बहिण, तिचे मिस्टर. मीही जाऊदे म्हणून गप्पं बसलो. पण वाईट वाटलं. किती भित्रे आम्ही ? कशाला भितोत एवढे ?

वाघाला नखं असतात……….सापाला विष असतं……….आणि हिजड्यांना टाळ्या असतात. शस्त्रांच्या किती या तऱ्हा ???

पण प्रसंगी वाघाशीही दोन हात करणारे……………नागाचा फणा ठेचणारे आम्ही……….या अशा टाळ्यांच्या शस्त्रा समोर शरणागती का पत्करतोत .

कि ‘ नंगे को खुदा भी डरता है !’ हेच ख़र.

मला ओलांडून तो घोळका पुढं गेला. टाळ्या वाजवत साईं बाबांच्या समोरुनही नाहीसा झाला. वाटलं, काय साधलं या जीवांनी ? कोणतं समाधान मिळवलं असेल ?

देवदर्शनाचं कि नुसत्या टाळ्यांच्या जीवावर आपण समाजावर कसं अधिराज्य गाजवतो हे जाणून घेतल्याचं. 

मी दर्शन घेऊन बाहेर आलो.

साईबाबा भिंतींच्या आत……….कडेकोट बंदोबस्तात.

तो घोळका बाहेर आईसक्रीमची चव चाखत.

Advertisements

2 Comments

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s