इतिहास कसा बदलतो

परवा शिवजयंती होती. दुसऱ्या दिवशी मी एके ठिकाणी गेलो होतो. तिथं गल्ली गल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या छबीसह अनेक कथित मावळ्यांचे फोटो असणारे फ्लेक्स झळकत होते.

एका मुख्य चौकातल्या शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती कटआउटनं माझं लक्ष वेधून घेतलं. तीच पराक्रमी मूर्ती……….हातात नागवी तलवार………..मुघलांवर चालून जात असल्यासारखा तोच आवेश………..हिंदवी स्वराज्याला वाहून घेतल्याची प्रत्येक पावलातली जाण……….बस्स !!!!!

डोक्यावरच्या शिरपेचापासून ते पायामधल्या मोजड्यानपर्यंत मी त्या पराक्रमी मूर्तीला नखशिखांत पहात राहिलो.

आणि खाली लिहिलं होतं.

” बघतोस काय ? मुजरा कर. ”

खरंतर त्या मूर्तीमंत शौर्याला मी कधीच मुजरा केला होता.

त्या खाली लिहिलं होतं.

सौजन्य : गारजाई देवी मित्र मंडळ.

मला कीव करावीशी वाटली त्या तरुणांची.

अरे ! घोड्यांच्या टापाखाली मुलुख तुडवताना खुद्द शिवाजी महाराजही कधी कुणाला असं म्हणाले नसतील. मग त्या पराक्रमी शूर पुरुषाच्या नावाखाली हे असं केवळ अंगातला माज दाखवणारं वाक्य लिहून त्या तरुणांनी  काय साधलं.

आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे पराक्रमी व्यक्तिमत्व, ” मला मुजरा कर असं कधी कुणाला सांगत नाही.” आणि असं व्यक्तीला लोकही न सांगता मुजरा घालतात तो त्या व्यक्तीला नव्हे तर त्या व्यक्तीच्या शौर्याला.

पण शौर्य काय असतं ………..पराक्रम काय असतो हे आजच्या भाकरीच्या तुकड्या मागे धावणाऱ्या ……………छानछोकीची आस असणाऱ्या तरुण पिढीला कसं कळणार ?

” बघतोस काय ? मुजरा कर. ”
हे वाक्य मी आजतागायत अनेक गाड्यांच्या मागे वाचलंय. ते वाक्य वाचताना त्या गाडीतल्या व्यक्तीच्या विचारसरणीची अनेकदा किव केलीय.

पण परवाचा प्रसंग पहिला आणि मनात अनेक विचार येत गेले.

काही वेळा इतिहास असाच बदलत असेल.

म्हणजे काय होत असेल ? पहा.

समजा ते गाव उध्वस्त झालं. आणि हा फ्लेक्स कुठतरी जमिनी खाली गाडला गेला. तर काही शतकानंतर कुठल्या तरी उत्खननात हा फ्लेक्स कुणाला तरी सापडला तर तो प्रथम दर्शनी असाच अंदाज बांधणार कि काही शतकांपूर्वी एक पराक्रमी योद्धा होऊन गेला असावा आणि तो रयतेकडून स्वतःला मुजरा घालून घेत असावा.

इतिहास बदलण्या बाबतचा हा माझा विचार बाजूला ठेवला तरी तरुणांनी उत्साहापोटी थोर पुरुषांच्या मागे अशी विधानं चिटकवू नयेत हे नक्की.


Advertisements

3 Comments

  1. Very True,Agree on each of ur contention…

    People are using the Warrior kings traits to shield themselves[as on vehicle backs] n potray them as a larger than life picture as Marathas,rather than inculcating the values…
    By this truely it is questionable as to how much of true Swarajya values would drain to the next generation in the Correct form…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s