भारतीय संघ दंडास पात्र

भारतीय संघाला दंड करायला हवा. तुम्हीही माझ्याशी मताशी सहमत व्हाल.

म्हणजे पहा हं !!! सुरवातीला भारतीय संघ सगळ्या संघाची शिकार करून वर्ल्डकप जिंकणार असं वाटत होतं. पण उपांत्यपूर्व फेरीत पोहचू कि नाही अशी शंका येऊ लागली होती.

सहाजिकच होतं ते. ‘ अरे, फलंदाजी मजबूत म्हणजे गोलंदाजांनी नुसत्या गोट्याच खेळायच्या का ? ‘ नुस्ते सचिन सेहवाग कुठपर्यंत किल्ला लढवणार. तरी नशीब जहीर हातभार लावतोय. पण त्याच्या एकट्याच्या जीवावर त्याच्या वाट्याच्या १० षटकांमध्ये समोरचा आख्खा संघ कसा बाद करता येणार. आणि म्हणूनच या विश्वचषकात आत्ता पर्यंत झालेल्या ७ सामन्यात आपण विंडीजचा संघ वगळता अन्य कोणत्याही संघाला पूर्णतः बाद करू शकलो नाही.

सहाजिकच भल्या भल्यांनी विजेतेपदाच्या यादीतून भारताचं नाव वगळून टाकलं होतं. पण मोठ्या दिमाखात उपांत्यपूर्व फेरी जिंकून भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहचला आणि तिथच चुकलं. सगळीकडे अहाकार माजला. मेनका गांधी पुढे सरसावल्या. हरणांची शिकार करून गजाआड जाऊन आलेला सलमानही फिल्मी अंदाजात पुढे आला. ‘ प्राणीप्रेमींनी ‘ तर दंडकारण्य यात्राच ( दांडी यात्रेच्या नामसाधर्म्यावरून ) काढायची ठरवलंय. सगळ्यांचा एकच सूर. ” भारतीय संघाला शिक्षा…………….व्हायलाच हवी.”
अरे सेमिफायनला गेले ते गेले. ते सेमिफायनला जायला हवेत असं सगळ्यांनाच वाटत होतं. पण त्यासाठी एखाद्या दुसऱ्या कांगारूची शिकार केली असती तर ठीक होतं ना. पण एक दोन नव्हे चक्क अकरा कांगारूंची शिकार करणं म्हणजे फारच झालं.

आता सांगा, ” भारतीय संघाला शिक्षा व्हायलाच हवी.” हे माझं म्हणणं पटतयना तुम्हाला ?
चला सांगा काय शिक्षा करायची भारतीय संघाला.

मी ठरवलंय आता भारतीय संघान वर्ल्डकप जिंकला तरच भारतीय संघाला अकरा कांगारूंची शिकार माफ.

मला माहिती आहे, तुम्ही म्हणणार वर्ल्डकप जिंको अथवा न जिंको पण उद्या पाकड्यांना आस्मान दाखवलं तरी भारतीय संघाला अकरा कांगारूंची शिकार माफ.

बरोबर ना.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s