म्हातारीच्या मागे धावावसं वाटतंय

ऑफिस सुटलं. ऑफिसच्या बसमध्ये बसलो. शहरातल्या सर्वात मोठ्या चौकात बस थांबली. अंगातला आळस, मरगळ घेऊन खाली उतरलो. सरावानं चौक क्रॉस करू लागलो.

चौक म्हजे असा काही गर्दीचा कि बारा वर्षातून एकदा भरणारा कुंभमेळा बरा. आमच्या या चौकात बारा महिने चोवीस तास कुंभमेळा. वाऱ्यासारखी आपल्या देहाच्या चोहोबाजूनं वाहनं सुसाट धावत असतात. कोण्या एका वाहनाच्या चाकाखाली सटवाईनं आपलं मरण लिहून ठेवलंय हे माहित नसतं.

पण हे सारं इतकं सवयीचं झालंय कि मागे शंभर कुत्री धावली तरी हत्तीनं निमूट आपला रस्ता चालावा इतक्या सवयीनं मी रस्ता ओलांडत असतो.

रस्ता ओलांडत असताना मी चौकातील रस्त्याच्या मधोमध पोहचलो. आणि मला म्हातारी दिसली. पांढऱ्या शुभ्र केसांची. मध्ये तपकिरी रंगाचं पोट घेऊन मिरवणारी. वाऱ्यावर उडणारी. आला नं लक्षात मी कोणत्या म्हातारीविषयी बोलतोय ते ? मला माहिती आहे. तुम्हीही असेच कधी काळी त्या म्हातारीच्या मागे धावलाय. होय शेवरीच्या शेंगेमधून बाहेर पडणाऱ्या आणि हवेवर पंख पसरून उडत रहाणाऱ्या म्हातारीविषयी बोलतोय मी.

कितीतरी वर्षांनतर माझ्या डोळ्यात लहानपणीची चमक उमटली. अवतीभोवतीच्या गर्दीचा विसर पडला. वाटलं धावावं आणि तिला अलगद तळहातावर उतरवून घ्यावं. पण नाही तसं करू शकलो. हात मारून तिला अलगद मुठीत कैद करावी असंही वाटलं.

पण ती त्या पोहचे पल्याड होती. तिला हवेवरती उडत रहाताना पाहणच माझ्या नशिबी आलं. पण तरी ओठात एक हसू आणि मनात एक उत्साह घेऊन मी वाट चालू लागलो. या धावपळीच्या जगातही आपलं लहानपण अजून टिकून आहे, हे पाहून बरं वाटलं.

Advertisements

1 Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s