जिंकणे हा धर्म अमुचा

पाकिस्तान सोबतची म्याच व्हायच्या आधी मी –

पैज लावताय ????

हा लेख लिहिला होता. आम्ही पाकिस्तानसोबतची म्याच लिलया जिंकली. पण तेव्हापासून माझ्या मनात –

” जिंकणे हा धर्म अमुचा, हार आम्हा ठाव नाही
तुम्ही करा काही कितीही, हा रडीचा डाव नाही.”

या ओळी आकाराला आल्या होत्या.

वर्ल्डकप सुरु व्हायच्या आधीपासून भारतीय संघ २८ वर्षांनतर पुन्हा इतिहास घडवणार आणि वर्ल्डकप खेचून आणणार असा मलाच काय पण तमाम भारतीयांना विश्वास होता. पण साखळी फेरीतली भारताची कामगिरी खूप ढिसाळ झाली आणि माझ्यासह अनेकांचा मनात शंकेची पाल चुकचुकली. देशविदेशातल्या तज्ञांनी आणि माजी खेळाडूंनी तर भारताला विजेतेपदाच्या स्पर्धेतून बादच करून टाकलं होतं.

पण वेस्ट इंडीज विरुद्धच्या विजयान भारतीय संघात नवचैतन्य निर्माण केलं आणि मग सतत तीन वेळा विश्वकप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला भारतीय संघान माती चारली आणि त्यानंतर परंपरागत शत्रू पाकिस्तानला मैदानातून हुसकून लावलं.

झालं. हा हा म्हणता फायनल आली. आणि समोर दहातोंडी रावणाचे वंशज.

पण श्रीरामाची परंपरा सांगणाऱ्या मातीला रावण काही नवीन नव्हता. आपला वध कधी आणि कसा झालं हे जसं रावणाला कळलं नाही तसंच श्रीलंकेच्या खेळाडूंनाही.

हे महायुद्ध सुरु व्हायच्या आधीपासून, ” आम्हाला सचिनसाठी वर्ल्डकप जिंकायचाय ” असं धोनीसह प्रत्येक खेळाडू म्हणत होता. आणि अंतिम सामन्यात सचिन लवकर बाद होवूनही आपल्या संघानं विश्वकप जिंकला आणि त्यांचे शब्द खरे करून दाखवले. प्रत्येक विजयात प्रत्येकाचाच वाट असतो. पण समजा या अंतिम सामन्यात सेहवाग शून्यावर बाद झालेला असताना सचिननं शतक झळकावत म्याच जिंकली असती तर इतर खेळाडूंना त्या विजयावर हवा तसा हक्क सांगता आला नसता.

पण २ बाद १९ या परिस्थितीतून सामना जिंकताना भारतीय संघातल्या प्रत्येक खेळाडूनं आम्हाला सचिन विषयी किती आदर आहे हेच दाखवून दिलं…….आणि त्याच बरोबर दाखवून दिली भारतीय संघातील एकजीवाची ताकद.

सचिन तू आणखी एक वर्ल्डकप खेळावास एवढ बळ परमेश्वरानं तुला द्यावं.

” जिंकणे हा धर्म अमुचा, हार आम्हा ठाव नाही
तुम्ही करा काही कितीही, हा रडीचा डाव नाही.”

ही कविता कशी पूर्ण झाली हे उद्या सांगेन.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s