सचिनला भारतरत्न ???

सचिन महान आहे या विषयी मलाच काय पण जगात कुणालाही शंका असण्याचं काही एक कारण नाही. आज गानकोकिळा लतामंगेशकरांपासून आमचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह साऱ्यांनीच सचिनला भारतरत्न पुरस्कार द्यावा असा सूर लावलाय. पृथ्वीराज चव्हाणांच काय जातंय ? उलट या माध्यमातूनही ते त्यांच्या पदरी जनतेची सहानभूती पाडून घेणार आहेत. लता मंगेशकरांनी तर काय सचिनला स्वतःचा मुलगाच मानला आहे. आपल्या मुलाला भारतरत्न हा या देशातला सर्वोच्च पुरस्कार मिळावा असं कोणत्या आईला वाटणार नाही ?

अगदी मलाही सचिनला भारतरत्न पुरस्कार मिळावा असंच वाटत. पण भारतीय संविधानात तशी तरतूद नाही.

भारतीय संविधानात, ”   भारत रत्न हा किताब फक्त कला, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींनाच दिला जावा. ” असं म्हटलं आहे.

पद्म विभूषण पुरस्कारात मात्र क्रीडाक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे.

या कायदेशीर बाबी बाजूला ठेवल्या तरी सचिनला भारत रत्न पुरस्कार देण्याची काही गरज नाही असं मला ठामपणे म्हणावसं वाटत.

त्याचं मुख्य कारण म्हणजे –
” सचिनला भारत रत्न देणं म्हणजे खऱ्या मोत्यावर कृत्रिम मुलामा चढवण्यासारखं आहे.”

दुसरी गोष्ट म्हणजे –
सचिनची कामगिरी खूप महान आहे. त्याला भारत रत्न पुरस्कार द्यायचा असेल तर कायद्यात बदल करायलाही हरकत नाही. पण एकदा का कायद्यात बदल झाला कि आमचे पुढारी खिरापतीसारखी त्या पुरस्काराची वाटप करत सुटतील. त्यामुळेच सचिनला हा पुरस्कार द्यायचा असेल तर कायद्यात बदल करण्याऐवजी आमच्या राष्ट्रपतींनाच या विषयी निर्णय घेऊ द्यावा.

आणखी एक गोष्ट अशी –
कला, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात केल्या जाणाऱ्या कामगिरीतून समाज घडत जातो म्हणून अशा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देणं न्यायचं आहे. परंतु सचिनची कामगिरी त्या तोडीची नाही. सचिननं ज्या रीतीनं स्वतःची कारकीर्द घडवलीय आणि मैदानात इतरांसमोर जो आदर्श ठेवलाय त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. देशातले अनेक तरुण आपण सचिन व्हायचं असं स्वप्नं उराशी बाळगतील. पण आयपीएल आणि रणजीचा विचार केला तरीही अगदी मुठभर लोकांपुरताच हा परिणाम असणार आहे संपूर्ण समाजावर नाही.

शिवाय तरुण पिढी जेव्हा महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, टाटा, बिर्ला यासारख्या व्यक्तींचा आदर्श समोर ठेवते तेव्हा त्याच्या परिणाम समाजाच्या सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीत होतो.

साहित्यक्षेत्रातल्या एखाद्या व्यक्तीला जेव्हा हा पुरस्कार दिला जातो तेव्हा त्या लेखकाच्या साहित्यकृतींनी संपूर्ण समाज ढवळून काढलेला असतो आणि समाजाला एक योग्य दिशा दिलेली असते.

सचिनची कामगिरीही समाज ढवळून काढणारीच आहे पण त्याच्या कामगिरीचा समाजाच्या सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीवर होणारा परिणाम मात्र फारच मर्यादित स्वरूपाचा असेल.

नावारूपाला आलेल्या व्यक्तीला पुरस्कार देणं हे आता एक फ्याड झालं आहे.

म्हणूनच खरंतर या गोष्टीची देशभर एवढी चर्चा सुरु असताना सचिननं स्वतःच विनम्रपणे हा पुरस्कार नाकारायला हवा.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s