आण्णा, तुम्ही चुकताय !!!!

आण्णा !!
म्हणजे आपले भ्रष्टाचार विरोधी फेम आण्णा हजारे……….
गल्ली पासून दिल्लीपर्यंत सगळा समाज ढवळून काढणारे आण्णा हजारे……….
चक्क सोनिया गांधींनाही दखल घ्यायला लावणारे आण्णा हजारे……….
महाराष्ट्राच्या सीमा पार करून दिल्लीपर्यंत पोहचलेले आण्णा हजारे.

पण हे भ्रष्टाचाराच्या विरोधातील उपोषण सोडायची आण्णांनी फारच घाई केली असं मला वाटत. आण्णांनी उपोषण सोडायलाच नको होतं असं मला म्हणायचं नाही. पण या राजकारण्यांनी आश्वासन दिलं आणि ते, ते पाळतीलच असं आण्णांनी गृहीत धरलच कसं ?

आण्णा तुम्ही आम्हाला माहितीचा अधिकार दिलात……..आता तुम्ही आम्हाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करू पाहता आहात. तुम्ही खूप काही करता आहात आमच्यासाठी.

खरंतर तुम्ही चुकताय असं म्हणण्याची माझी पात्रताही नाही. पण तरीही तुम्ही दिल्लीतून विजयी होऊन परतल्यानंतर तुमच्या  राळेगणसिद्धीत तुमची ढोल , ताशे, लेझीम, उंट, घोडे, हत्ती या ताफ्यासह जी मिरवणूक काढण्यात आली आणि तुम्ही ती स्वतःवर लादून घेतलीत तिला तुम्ही विरोध करायला हवा होता. तुमच्या विजया प्रित्यार्थ हत्तीवरून साखर वाटण्यात आली, ते तुम्ही पहात रहायलात. हे चुकीचं वाटलं.

आण्णा स्वतःची अशा रीतीनं मिरवणूक काढू द्यायला तुम्ही काही लोकांच्या पैशावर माजलेले पुढारी नाही आहात………..किंवा तुम्ही कुठले राजेही नाही आहात. ……..तुम्ही आहात एक समाजसेवक.

आज काही जन तुम्हाला प्रति महात्मा गांधी म्हणू लागलेत. त्या भावनेचा आदर ठेवा आण्णा आणि यापूढ अशा गोष्टी टाळा. याहीपेक्षा आण्णा, भारतीयांची स्विस ब्यांकेतली खाती गोठवून तो पैसा भारतात परत कसा आणता येईल या विषयी विचार करा. आम्ही सारे तुमच्या सोबतच आहोत.

Advertisements

4 Comments

  1. Vijay Shendge Saheb – I don’t think, anything wrong happened. Anna may not be Raje but remember Anna had done so many good things that he became Raje of common man. 2day everybody is in hurry to become a rich man in short time. Anna had reminded us how to live in this world in simple way. In big cities like Mumbai, Pune & Delhi, the price of the flats are more than 2 cr & people buy the flats in this rate. From where this money came ? Think. My salute to Anna.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s