नाही नाचायाचा मोर

ती आयुष्यातून दूर जाते आणि तो आपण तिच्या आठवणीत हरवून जातो. जगण्याची खरंतर इच्छाच उरलेली नसते त्याला. पण उद्याची आशा त्याला जगायला भाग पडते. मनात कुठेतरी एक उमेद असते नाही ती येईल पुन्हा आपल्या आयुष्यात आणि दरवळून जाईल आपलं आयुष्य पुन्हा एकदा.

आता देवाला तरी काय मागायचं ? असाही प्रश्न त्याला पडतो. कारण –

तिच तर त्याचा देव……….
तिच त्याच्या अंगणातली जाई……
तिच त्याचं आयुष्य गंधाळून टाकणारी जुई.
तिच्याशिवाय त्याचं आयुष्य म्हणजे एक पोकळी……..रिकामी रिकामी.
तिच्याशिवाय त्याचं आयुष्य म्हणजे एक फुल………दरवळ नसलेलं.
तिच्याशिवाय त्याचं आयुष्य म्हणजे एक दिवा……….ज्योत नसलेलं.

तिची सोबत नसण्याचं दुःख सोसायचं कसं ? हे सांगताना तो म्हणतो-

काही नाही गं आता अश्रूंच्या रुपानं दुःख डोळ्यातून डोकावू लागलं कि डोळे मिटून घ्याचे आणि ओठातला हुंदका ओठातच दाबून सारं दुख पापण्यांच्या आड लोटून द्यायचं. तू सोबत नसल्यामुळे आयुष्यात दुःखाचे जे काही कडू घोट प्यायला लागतील ते डोळे मिटून निमूट प्यायचे.

तुझी सोबत नसण्याचं दुःख मी पापण्यांच्या आड लोटून दिलंय. त्यामुळं मी तुला दुःखी दिसणार नाही. कदाचित एक हलकसं हसूच दिसेल तुला माझ्या चेहऱ्यावर. पण ते हसू उसनच असेल हे लक्षात असू दे. कारण तुझी सोबत असण्याचा आनंद मला मिळणार नसेल तर आनंदाच्या ……… सुखाच्या दुसऱ्या कुठल्याही क्षणांनी माझ्या मनातला मनमोर नाचणार नाही.

तू सोबत नाहीस याचं दुःख असलं तरी मी अगदीच हतबल झालेलो नाही काही. मी तुझ्या जुन्या आठवणींना घट्ट उराशी घेतो……..कधी कधी स्वतःला तुझ्या आठवणींच्या कुशीत खोल झोकून देतो. आणि माझ्या नशिबी कितीही दुःख आलं तरी तुझ्या ओंजळीत मात्र फक्त सुखाचच दान पडावं अशी पार्थना करत रहातो.

एका वेडया प्रियकराच्या भावना सांगणारी ही कविता –

 

प्रेम कविता, love poem

प्रेम कविता, love poem

Advertisements

4 Comments

 1. खुप छान

  आठवणींच्या सागरात मासे का पोहत नाही..?
  आमावस्येच्या रात्री चंद्र कधी दिसत नाही..?
  कितीही जगले कुणी-कुणासाठी…
  कुणीच कुणासाठी मरत नाही..!

  अनुभव असतात प्रत्येक क्षणाला…
  पण नशिबाचे चक्र थांबत नाही…
  आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर…
  त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही…

  @विकी@

  • सुवर्णा खूप खूप आभारी आहे. तू म्हणतेस, ” मनाला खूप हुरहूर का लागली. ते कळत नाही.” त्याचा कारण सांगू , सध्या भावनेपेक्षा, प्रेमापेक्षा कर्तव्याच पारड अधिक जड झालंय.

 2. विजयजी,नमस्कार…
  व्वा!खुप सुंदर. साध्या सोप्या शब्दांमधुन मनाला भिडणारी
  सुंदर कविता.धन्यवाद आणि खुप सा-या शुभेच्छा…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s